वाराणसी येथील नमामी गंगेच्या धर्तीवर सादर करण्यात आलेल्या नमामि गोदा प्रकल्पाला शासनाने नकार दिला असला तरी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मात्र कृती आराखड्यास मान्यता दिली आहे. यात नाशिकच्या सोमेश्वर ते नांदेड जिल्ह्यातील राहेडपर्यंतच्या नदी क्षेत्राचा समावेश करण्यात आला असून, हे क्षेत्र जवळपास ५०४ किलोमीटर आहे. गोदा स्वच्छतेचा हा द्राविडी प्राणायाम किती फलदायी ठरतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.