पुन्‍हा महाभारत अटळ; सज्‍ज राहा!

डॉ. मुंजे स्मृती व्याख्यानमालेत मेजर जनरल (निवृत्त) बक्षी यांचे आवाहन
पुन्‍हा महाभारत अटळ; सज्‍ज राहा!
Updated on

नाशिक : केवळ ढाल बाळगत युद्धात विजय मिळविता येत नाही, तर तलवारही चालवावी लागते. भारताविरोधात चीन, पाकिस्‍तानची अनेक कट-कारस्‍थाने हाणून पाडली गेली. त्‍यामुळे कोरोना महामारीच्‍या रूपाने छुपे युद्ध खेळले जात आहे. अहिंसाचाराचा विचार टिकाव धरणारा नसून, कलियुगाच्‍या अंताकडे जाताना पुन्‍हा महाभारत अटळ आहे. या युद्धाचा सामना करण्यासाठी तरुण योद्ध्यांनी सज्‍ज राहावे, असे आवाहन मेजर जनरल (निवृत्त) गगनदीप बक्षी यांनी रविवारी (ता. १२) केले.

गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्‍युकेशन सोसायटीतर्फे धर्मवीर डॉ. बा. शि. मुंजे यांच्‍या १४९ व्‍या जयंतीनिमित्त सुरू असलेल्या व्‍याख्यानमालेत ते बोलत होते. संस्थेचे सरकार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर अध्यक्षस्थानी होते. सहाय्यक धर्मादाय आयुक्‍त आर. ए. लिपटे, संस्‍थेच्‍या नाशिक विभागाचे अध्यक्ष कॅप्‍टन श्रीपाद नरावणे, कार्यवाह हेमंत देशपांडे आदी उपस्‍थित होते.

श्री. बक्षी म्‍हणाले, की गेली ४२ वर्षे चीनने लढाई केलेली नाही, तर पाकिस्‍तानला अनेक वेळा भारताकडून पराभव पत्‍कारावा लागला. या दोन्‍ही देशांच्‍या छुप्‍या कारवायांना सडेतोड उत्तर सैन्‍याने दिलेले आहे. त्‍यामुळे आता कोरोना महामारीच्‍या रूपाने युद्ध लढले जाते आहे. सर्व प्रकारच्‍या परिस्‍थितीला तोंड देण्यासाठी सज्‍ज राहणे आवश्‍यक असल्‍याचे त्‍यांनी नमूद केले. आपल्‍या कारकीर्दीतील अनुभव विशद करतानाच त्यांनी उपस्‍थित विद्यार्थ्यांना प्रोत्‍साहित केले. भोसला सैनिकी शाळेच्या विद्यार्थिनींनी स्‍वागतगीत म्‍हटले. नितीन गर्गे यांनी परिचय करून दिला. अनिरुद्ध तेलंग यांनी पद्य म्‍हटले. मेजर विक्रांत कावळे यांनी सूत्रसंचालन केले.

ही मराठ्यांची गौरवशाली भूमी

अनेक शतकांपासून देशाच्‍या रक्षणार्थ महाराष्ट्र भूमीने योगदान दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी अनेक हल्‍ले परतविले. राणी लक्ष्मीबाई यांनी इंग्रजांविरोधात करडी लढाई केली. आजही सैन्‍यात मराठा जवान शत्रूंशी दोन हात करत आहेत. या मराठ्यांच्‍या गौरवशाली भूमीला नमन करतो, असे सांगताना त्‍यांनी आठवणींना उजाळा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Education expert Bhausaheb Chaskar urged immediate restructuring of the Teacher Eligibility Test to improve the quality of school education.
Tukaram Mundhe milk adulteration complaint
Who is Prashant Wadile?
MP Supriya Sule
Marathi News Esakal
www.esakal.com