तर संमेलने शेवटची ठरतील; नायगावकर

संमेलनपूर्व काव्योत्सवात मांडली खंत
तर संमेलने शेवटची ठरतील; नायगावकर
Updated on

नाशिक : लहान मुलांना पुस्तके, कविता आणून ठेवा, बालकविता आणून द्या, परदेशात तरूण मुले वाचतात, ऐकतात मात्र आपल्याकडे परिस्थिती वेगळी आहे. ही परिस्थिती बदलून साहित्य संमेलनाच्या मांडवात वेगळी परिस्थिती पाहायला मिळो, त्यासाठी नाशिकमध्ये काळजी घेणे महत्वाचे आहे. अन्यथा संमेलने शेवटची ठरतील, अशी खंत अशोक नायगावकर यांनी व्यक्त करत लंडनमध्ये लिहिलेली अभिमान कविता सादर केली.

साहित्य संमेलन नियोजन समिती व खानदेश मराठा मंडळ यांच्यातर्फे महाकवी कालिदास कलामंदिरात मंगळवारी (ता. ३०) संमेलनपूर्व काव्योत्सव हा कार्यक्रम झाला. त्यावेळी श्री. नायगावकर बोलत होते. ते म्हणाले, की कवी करंदीकर, पाडगावकर, सरीता पत्की आदींनी बालकविता लिहिल्या. त्या कविता आताच्या आणि पुढील पिढीच्या कानावरून गेल्या नाही, तर मराठीचे काही खरे नाही असे मला वाटते. बालकांच्या ओठावर कवी करंदीकरांच्या बालकवितांच्या ओळी कधीतरी जातील आणि नंतर मग अरूण म्हात्रे, संजय चौधरींच्या कविता त्यांच्या ओठावर येतील, असे त्यांनी नमूद केले. पुढच्या एका पिढीनंतर आपल्या घरात वाचणारे, लिहिणारे मराठी लोक राहणार आहेत का? असाही प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. प्रा. शंकर बोऱ्हाडे, प्राचार्य प्रशांत पाटील, भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे, अविनाश पाटील, उषा सावंत, मधुकर झेंडे, अशोक पाटील, मनोज पाटील आदी उपस्थित होते.

मैफल रंगली

संमेलनपूर्व कावोत्सवात गोविंद नाईक यांनी ‘कोणाच्या इतका जवळ जात आहे, मी कोणाच्या एवढा भाग्यात आहे’ ही कविता सादर करत श्रोत्यांची वाहवा मिळवली. त्यानंतर त्यांनी ‘नाव किनाऱ्याकडे वळवळी नाही, मग लाटांची भिती उरली नाही’ कविता सादर करून ‘कोणी करू नका मागणी सुर्याची, बदलत आहे व्याख्या उजेडाची ही गझल सादर केली. तुकाराम धांडे यांनी ‘पुनर्वसन’ कविता सादर करत वन्समोअरची दाद मिळवली. दुसरी ‘साहेब’ ही कविता सादर केली. संतोष वाटपाडे यांनी ‘फुलांची छाटणे गर्दन, तसा अन्याय आहे का, हवे असल्यास उत्तर आणखी पर्याय आहे का’ ही गझल सादर करून ‘कशी ठेवली, कशी टिकवली, दु:खावर दहशत माझी’ ही कविता सादर केली. संजय चौधरी यांनी माझ्या वयाची कविता सादर केली. जयश्री कुलकर्णी यांनी कित्येक काळजा अन्‌ सोबत जबाबदाऱ्या ही कविता सादर केली. वैशाली शेंबेकर, देविदास चौधरी, किरण सोनार आदी कवींनी कविता सादर केल्या. अरूण म्हात्रे यांनी सूत्रसंचालन केल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com