नाशिक : वैद्यकीय’ च्‍या प्रवेशाला लागेना मुहूर्त

अनागोंदी कारभाराने पालक-विद्यार्थ्यांच्‍या पोटात गोळा
नाशिक : वैद्यकीय’ च्‍या प्रवेशाला लागेना मुहूर्त
नाशिक : वैद्यकीय’ च्‍या प्रवेशाला लागेना मुहूर्तsakal

नाशिक : दिवाळी झाली.. वर्षही सरायला आले... विविध अभ्यासक्रमांचे शैक्षणिक वर्षातील द्वितीय सत्रदेखील सुरु झाले. परंतु वैद्यकीय अभ्यासक्रमांच्‍या प्रवेश प्रक्रिया अद्यापही दिशाहीन आहे. ही प्रक्रिया कधी सुरु होईल, प्रक्रियेचे स्वरूप कसे असेल, यासर्व बाबींसंदर्भात पालक व विद्यार्थी अनभिज्ञ आहेत. पुढे कसे होणार या विचारांनी या घटकांच्‍या पोटात अक्षरशः गोळा येत असल्‍याची दयनीय स्‍थिती सध्या आहे.

एमबीबीएस, बीडीएस यासह बीएएमएस, बीएचएमएस, बीयुएमएस, फिजिओथेरपी, बी.एस्सी (नर्सिंग) अशा सर्वच अभ्यासक्रमात प्रवेशासाठी विद्यार्थी प्रतिक्षेत आहेत. न्यायप्रविष्ट बाबींमुळे प्रवेश प्रक्रिया राबविली जात नसल्‍याचे कारण काही सजग पालकांकडून सांगितले जात आहे. परंतु या संदर्भात सीईटी सेल, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय (डीएमईआर) यांच्‍या संकेतस्‍थळावर साधा शब्‍ददेखील उपलब्‍ध नाही. अशात ही संपूर्ण प्रक्रिया दिशाहीन झालेली आहे.

नाशिक : वैद्यकीय’ च्‍या प्रवेशाला लागेना मुहूर्त
नाशिक : शाळांकडे वळली चिमुकल्‍यांची पावले..!

गेल्‍या १२ सप्‍टेंबरला नॅशनल इलिजिब्‍लीटी कम एंट्रान्‍स टेस्‍ट (नीट) परीक्षा राष्ट्रीय स्‍तरावर घेण्यात आली होती. यानंतर या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यासाठी चाळीसहून अधिक दिवसांचा कालावधी उलटला. किमान निकाल जाहीर झाल्‍यानंतर लागलीच प्रवेश प्रक्रियेला सुरवात होणे अपेक्षित होते. परंतु शैक्षणिक वर्षाचे दुसरे सत्रदेखील काही महिन्‍यात संपायला आले असताना अद्यापपर्यंत प्रवेश प्रक्रियेला सुरवातदेखील झालेली नाही. ही प्रक्रिया सुरु झाल्‍यानंतर सुमारे एक ते दीड महिन्‍याचा कालावधी पूर्ण होण्यासाठी लागेल. अशा या गोंधळलेल्‍या परिस्थितीमुळे पालक-विद्यार्थ्यांकडून मनस्‍ताप व्‍यक्‍त केला जातो आहे. प्रवेश प्रक्रियेची नेमकी काय स्‍थिती आहे, याबाबत किमान सूचना तरी जारी करावी, अशी माफक अपेक्षा व्‍यक्‍त होत आहे.

अभ्यासक्रम पूर्ण होणार तरी कसा

काही वर्षे पूर्वीपर्यंत वैद्यकीय शिक्षणाचे प्रथम वर्ष हे साधारणतः दीड वर्षाचे असायचे. गेल्‍या काही वर्षांत एक वर्षापर्यंत मर्यादित करण्यात आले. परंतु आता शैक्षणिक वर्ष २०२१-२२ संपायला अवघे काही महिने उरलेले असताना इतक्‍या अल्‍प कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करणार तरी कसा, असा प्रश्‍न उपस्‍थित केला जातो आहे.

काहींची अभ्यासाला सुरवात, काहींकडून अभियांत्रिकीला प्रवेश

नीटच्‍या राष्ट्रीय क्रमवारीत चांगल्‍या क्रमवारीत आलेल्‍या विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेची वाट न पाहता अभ्यासाला सुरवात केली असल्‍याचे समजते. यासाठी विविध ॲप्‍स, संकेतस्‍थळावरुन निवडीची शक्‍यता असलेल्‍या अभ्यासक्रमाचा अभ्यास अशी मुले करत आहेत. तर प्रवेश मिळेल की नाही, या संभ्रमात असलेले विद्यार्थी वैतागून अभियांत्रिकी प्रवेशाकडे पावले वळवत असल्‍याची स्‍थिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com