सातपूर- पंचवटी येथील ‘द व्ही पार्क’ बांधकाम साईटवरील खड्ड्यात बुडून तिन बालकांचा मृत्यू झाल्यानंतर कामगार विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. संबंधित बांधकाम व्यावसायिकावर खटला दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही घटना २९ जून रोजी पंचवटी परिसरातील अमृतधाम विडी कामगार नगर येथे घडली होती.