
Nashik Crime News : जानोरीत कंपनीतून 18 लाखांची चोरी
लखमापर : जानोरी शिवारातील एस. व्ही. प्लॉस्टोकेम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत स्पेशालिटी केमिकल बनविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कथिल धातूच्या प्लेटा सुमारे १८ लाख ५६ हजार ७६४ रुपयांचा कच्चा मालाची चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे.
जानोरी- जऊळके दिंडोरी रस्त्यावरील जानोरी शिवारातील एस. व्ही. प्लास्टोकेम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत स्पेशालिटी केमिकल बनविण्यासाठी कथिलच्या प्लेटा वापरतात. त्या एका प्लेटाची किंमत साधारण 66 हजार 313 रुपये प्रमाणे आहे. त्या एका स्टोअररुमध्ये ठेवलेल्या असताना शुक्रवारी (ता.24) रात्रीच्या सुमारास स्टोअर रूमची मागील खिडकी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत प्रत्येकी 22 ते 25 किलोच्या अंदाजे 66 हजार 313 रुपये किंमतीच्या एकूण २८ प्लेटा चोरुन नेल्या. (Theft of 18 lakh from company at Janori Nashik Crime News)
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
त्याची एकूण 18 लाख 56 हजार 764 रुपये इतकी आहे. दुसऱ्या दिवशी (ता.२५) रात्री आठच्या सुमारास स्टोअर रूम उघडले असता कंपनीच्या कामगारांच्या लक्षात आले. त्यावरुन कंपनीच्या मालकांना ही घटना कळविण्यात आली. त्यांनी कंपनीत येऊन शहानिशा करून दिंडोरी पोलिस ठाण्यात चोरीबाबत माहिती दिली.
त्यावरुन पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलिस उपनिरीक्षक अरुण आव्हाड, पांडुरंग कावळे आदी घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलिस अधिकारी कविता फंडतळे यांनी भेट दिली. चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलिस उपनिरीक्षक अरुण आव्हाड, पांडुरंग कावळे आदी तपास करीत आहे.