नाशिककरांनो सावधान! आता उघडी घरेही ठरतायत चोरट्यांचे लक्ष्य

Crime
CrimeGoogle
Updated on

नाशिक : बंद असलेली घरे हेरून ती फोडायची, अशी चोरट्यांची आतापर्यंतची पद्धत होती. मात्र आता त्यांनी उघडे दिसेल ते घरावरही डल्ला मारणे सुरू केले आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. दरवाजा केवळ ढकलला आहे अन् गृहिणी आतल्या रूममध्ये काम करत आहे, अशी बेफिकीरी आता महागात पडू शकते. शहरात भरदिवसा वेगवेगळ्या भागातील उघड्या घरात प्रवेश करून चोरट्यांनी लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे.

ध्रुवनगर भागातील चोरीत पर्समधील रोकडसह सोन्याची पोत असा ८१ हजार ६०० रुपयांचा ऐवज लांबविला. उपनगर नाका भागात घरात शिरलेल्या चोरट्यांनी दोन मोबाईल लंपास केले. गंगापूर आणि उपनगर पोलिस ठाण्यातही चोरीचा गुन्हा दाखल झाला.

मनीषा धनंजय थेटे (रा. साई मंदिराजवळ, ध्रुवनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्या मंगळवारी (ता. ३) सकाळच्या सुमारास घरकामात व्यस्त असताना घराचे दार उघडे असल्याची संधी साधत चोरट्याने घरात प्रवेश केला. हॉलमधील लोखंडी कपाटाला टांगलेल्या पर्समधील एक हजार ६०० रुपयांची रोकड आणि सोन्याची पोत असा सुमारे ८१ हजार ६०० रुपयांचा ऐवज लांबविला. हवालदार भडांगे तपास करीत आहेत.

उपनगर नाका भागातील लारो मोहम्मद अलाउद्दीन खासून (५२, रा. महारुद्रा अपार्टमेंट) यांनी तक्रार दाखल केली. खातून कुटुंबीय बुधवारी (ता.४) आपापल्या कामात व्यस्त असताना चोरट्यांनी उघड्या घरात प्रवेश केला. भामट्यांनी हॉलमध्ये ठेवलेले सुमारे २० हजारांचे दोन मोबाईल लांबविले. मनोहरनगर येथील शीतल श्रीपाद कुलकर्णी (रा. सुमंगल हौसिंग सोसायटी) यांनी तक्रारीत म्हटले आहे, की कुलकर्णी कुटुंबीय शुक्रवारी (ता.६) सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. चोरट्यांनी बंद घराचे लॅचलॉक तोडून बेडरूममधील कपाटातील १३ हजार ६०० रुपयांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने, घड्याळे असा सुमारे दोन लाख ३७ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

Crime
नाशिक पोलिस आयुक्तांची अशीही श्रध्दा, आठ महिन्यांपासून रोजच गोदेत डुबकी!

बंद घरेही होताहेत लक्ष्य

पाथर्डी फाटा भागात सायली सुमित भामरे (रा. सिल्व्हर पाम सोसायटी, ज्ञानेश्वरनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार भामरे कुटुंबीय गुरुवारी (ता. ५) दुपारी कामानिमित्त घराबाहेर पडले असता चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून चोरी केली. चोरट्यांनी बेडरूममधील माळ्यावर ठेवलेली बॅग काढून त्यातील २८ हजारांची रोकड आणि चांदीच्या साखळ्या असा सुमारे २९ हजारांचा ऐवज लांबविला. इंदिरानगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. हवालदार कोकाटे तपास करीत आहेत. उपनगर हद्दीतील महात्मा गांधी सभागृह फोडून १३ हजारांचा ऐवज चोरून नेला. त्यात लोखंडी प्लेटा, केबल वायर आणि ट्यूबलाइटचा समावेश आहे. देवानंद शिंदे (रा. मोह, ता. सिन्नर) यांनी तक्रार दाखल केल्याने उपनगर पोलिसांत घरफोडीचा गुन्हा दाखल झाला.

Crime
मुख्यमंत्र्यांचे धाकटे पुत्र तेजस ठाकरे राजकारणात येणार का? भुजबळ म्हणाले..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com