HALकडून अद्याप लॉकडाउनबाबत आदेश नाही; शासन नियमांची पायमल्ली

जिल्हाधिकाऱ्यांनी १० मे रोजी एचएएल (HAL) कारखाना बाहेरगावाहून येणाऱ्या कामगारांसाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
hal-nashik.jpeg
hal-nashik.jpegGoogle
Updated on


ओझर (जि. नाशिक) : जिल्हाधिकाऱ्यांकडील १० मे रोजीच्या आदेशानुसार १२ मेपासून कडक लॉकडाउन (Lockdown) लागू करण्यात आला. वैद्यकीय आणि ऑक्सिजन निर्मिती आस्थपना वगळता सर्वांनी कंपन्या बंद ठेवल्या असताना देशाच्या संरक्षण व्यवस्थेचा कणा समजल्या जाणाऱ्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL)च्या व्यवस्थापनाने मात्र तीन दिवस उलटूनही कारखाना बंद ठेवण्याबाबत निर्णय घेतलेला नाही. परिणमी, सात ते आठ हजार कामगारांचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. (There are no work stoppage orders from HAL even after a strict lockdown order)

हस्तक्षेप करण्याची मागणी

जिल्हाधिकाऱ्यांनी १० मे रोजी एचएएल कारखाना बाहेरगावाहून येणाऱ्या कामगारांसाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी केली जात नाही. एचएएल (HAL) व्यवस्थापन कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ते सहकार्य करीत नसल्याचा आरोप केला जात आहे. तर, कामगार संघटनेने या प्रकरणी जिल्हाधिकारी, खासदार, पालकमंत्री यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी पत्राद्वारे केल्याचे सांगण्यात येत आहे. (There are no work stoppage orders from HAL even after a strict lockdown order)

hal-nashik.jpeg
नाशिकमध्ये 'रेमडेसिव्हिर'चा काळाबाजार; मेडिकल बॉयसह 3 नर्स ताब्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com