VIDEO : नाशिकमध्ये 'म्युकोरमायकोसिस'चे इंजेक्शन मिळेना; नातेवाईक हतबल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hortage of amphotericin-b injections for mucormycosis patients

कोरोनाचे निमित्त साधून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून राजकीय पोळी भाजून घेणाऱ्या राजकीय पक्षांनीदेखील नागरिकांच्या या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने रस्त्यावर उतरण्याच्या मानसिकतेमध्ये नागरिक आहेत.

VIDEO : नाशिकमध्ये 'म्युकोरमायकोसिस'चे इंजेक्शन मिळेना

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : ऑक्सिजन बेड, ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा, व्हेंटिलेटर बेड, तर त्यानंतर रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या (Remdesivir Injection) तुटवड्यानंतर आता म्युकरमायकोसिसच्या (mucormycosis) उपचारासाठी आवश्‍यक असलेल्या ॲम्फोटेरेसिन- बी इंजेक्शनच्या (amphotericin-b injection) तुटवड्यामुळे नागरिकांची फरफट होत आहे. जिल्हा रुग्णालय महापालिकेकडे, तर महापालिकेत औषध घेण्यासाठी गेल्यानंतर महापालिका जिल्हा रुग्णालयाकडे टोलवाटोलवी करत असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांचा मनस्ताप अनावर होत आहे. कोरोनाचे निमित्त साधून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून राजकीय पोळी भाजून घेणाऱ्या राजकीय पक्षांनीदेखील नागरिकांच्या या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने रस्त्यावर उतरण्याच्या मानसिकतेमध्ये नागरिक आहेत.

(There is a shortage of amphotericin-b injections for mucormycocis patients in Nashik)

कोविड उपचारातून सहीसलामत बाहेर पडल्यानंतर रुग्णांना पोस्ट कोविडच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. मधुमेही रुग्णांना म्युकरमायकोसिस म्हणजे बुरशीजन्य आजाराला सामोरे जावे लागत आहे. त्यात डोळे, नाकाची सर्जरी करावी लागते. सर्जरी झाल्यानंतर ॲम्फोटेरेसिन- बी इंजेक्शनची आवश्यकता भासते. राज्यभरात इंजेक्शनचा तुटवडा असला तरी वितरणातील अनियमिततादेखील समोर आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रथम नाशिक व मालेगाव महापालिका, तसेच ग्रामीण भागासाठी जिल्हा रुग्णालय असे वितरणाचे नियोजन केले होते.

हेही वाचा: लॉकडाउन ३१ मेपर्यंत, तरीही नाशिक जिल्ह्यात अनलॉकचे वेध

एका दिवसात निर्णय बदलला

ॲम्फोटेरेसिन- बी इंजेक्शनची नोंदणी ज्या रुग्णालयात रुग्ण दाखल आहे, त्या रुग्णालयानेच ऑनलाइन नोंदवावी त्यानंतर नियुक्त केलेल्या संस्थेमार्फत वितरण ठरले होते. परंतु एक दिवसात निर्णय बदलून जिल्हा रुग्णालयाकडे नियोजन दिले. आता पुन्हा आज नव्याने बदल करत नाशिक महापालिका हद्दीसाठी डॉ. आवेश पलोड, मालेगाव महापालिका हद्दीसाठी सपना ठाकरे, तर जिल्हा रुग्णालयात डॉ. संजय गांगुर्डे यांची नियुक्ती केली.

विसंवाद चव्हाट्यावर

अंमलबजावणीचे नियोजन निश्‍चित झाल्यानंतर कार्यवाही होणे अपेक्षित असताना महापालिका स्तरावर या निर्णयाची माहितीच नसल्याची बाब समोर आल्याने नागरिकांनी पुन्हा जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. मात्र रुग्णालयाचे दरवाजे बंद असल्याने केविलवाणी अवस्था नातेवाइकांची पाहायला मिळाली. यावरून महापालिका, जिल्हा रुग्णालयातील विसंवाद समोर आला असून त्यावर दाद कोणाकडे मागावी, या त्रासिक मानसिकतेत नागरिक आहे.

हेही वाचा: नाशिकमध्ये रॅपिड ॲण्टीजेन टेस्ट नंतरच होणार लसीकरण

शेकडो रुग्ण, पुरवठा अपुरा

शहर व जिल्हा मिळून म्युकरमायकोसिस आजाराचे १८० रुग्ण आहेत. एका रुग्णाला ७० ते ८० ॲम्फोटेरेसिन- बी इंजेक्शनची गरज भासते. एवढ्या मोठ्या प्रमाणात आवश्यकता असताना राज्य शासनाकडून मात्र अपुरा पुरवठा होत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार १९ मे रोजी ४०, २० मे रोजी १४० इंजेक्शन प्राप्त झाले. उपलब्धतेनुसार वाटप करण्यात आले. जिल्हा रुग्णालयाकडून १८६ रुग्ण असल्याची माहिती देण्यात आली, तर महापालिकेकडे २२७ रुग्णांची नोंदणी झाली आहे. यावरून रुग्ण संख्येचा घोळ देखील समोर आला आहे.

(There is a shortage of amphotericin-b injections for mucormycocis patients in Nashik)

loading image
go to top