Nashik Crime News : ऐन दिवाळीच्या दिवशी चोरट्यांनी एकाच रात्रीत फोडली 4 दुकाने

theft caught in CCTV
theft caught in CCTVesakal

झोडगे (जि. नाशिक) : झोडगे येथे दिवाळीच्या सणात एकाच दिवशी तीन कृषी सेवा केंद्र व एक इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रीचे दुकान चोरट्यांनी फोडून रोख रक्कमे व कांदा बियाणे चोरून नेल्याने व्यवसायिकांना मध्ये भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (thieves broke into 4 shops in one night at zodge on diwali nashik Latest Crime News)

theft caught in CCTV
Nashik: अन् वस्तीवरच्या गरोदर स्त्रीची नॉर्मल डिलिव्हरी करून त्यांनी दिले मुलीला जीवदान

राष्ट्रीय महामार्गलगत पोलिस स्टेशन पासून दोनशे मिटर अंतरावर असलेल्या भरवस्तीतील बिजाई कृषी सेवा केंद्रात रात्री तीन नंतर चोरट्यांनी मुख्य शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.त्यानंतर गल्लातील रोख रक्कम सुमारे वीस ते पंचवीस हजार रुपये रोख तसेच नामांकित कंपनीचे कांदा बियाणे सुमारे वीस किलो तीस ते चाळीस हजार रुपये किंमतीचे पोत्यात भरून पोबारा केला.

या घटनेचे दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे मध्ये चित्रीकरण झाले असून शेजारी असलेल्या शुभम इलेक्ट्रॉनिक्स दुकानांचे कुलूप तोडले मात्र चोरीच्या प्रयत्न अपयशी ठरला.तर शिवकृपा कृषी सेवा केंद्रात सुमारे पंधरा हजार रुपये किंमतीचे कांदा बियाणे चोरट्यांनी चोरून नेले. कांदा मार्केट शेजारील ज्ञानेश्वरी कृषी सेवा केंद्रात कुलूप तोडून चोरीच्या प्रयत्न केला. त्यामुळे मुख्य रहदारीच्या ठिकाणी असलेल्या दुकानातून चोरट्यांनी ऐन दिवाळीच्या सणात धुमाकूळ घातल्याने व्यवसायिकांनसह नागरिकांन मध्ये भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मागील दोन महिन्यां पुर्वी बिजाई कृषी सेवा केंद्राच्या पाठी मागे असलेल्या काॅलनी मध्ये निवृत्त प्राध्यापकांचा घरी मोठी चोरी झाली.त्या चोरीच्या गुन्हाचा तपास लागला नसल्याने चोरट्यांचे मनोबल वाढले आहे.त्या मुळे पोलिस तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून.झोडगे येथे पोलिस औटपोस्ट असून तेथून निवासी पोलीस कर्मचारी उपलब्ध असल्यास गुन्हेगारी वर आळा बसेल तर पोलिस गस्ती पथक तैनात करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी व व्यावसायिकांनी केली आहे.

theft caught in CCTV
Nashik : भाऊबीजेसाठी माहेरी गेलेल्या मावशी अन् भाचीचा दुर्देवी मृत्यू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com