Nashik Crime News : चोरट्यांचा मोर्चा वीज पंपांकडे; सुरगाणा तालुक्यात शेतकऱ्यांची वाढतेय डोकेदुखी

Thieves broke the wire and pipe and stole the pump.
Thieves broke the wire and pipe and stole the pump.esakal

सुरगाणा (जि. नाशिक) : तालुक्यात भुरट्या चोरट्यांनी दुचाकी, तसेच शेतकऱ्यांच्या शेतातील विहीर, बोअरवेल, नदीमधील बसवलेल्या वीज पंपाच्या चोरीकडे मोर्चा वळवल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. (Thieves march towards electricity pumps Surgana taluka farmers headaches increasing Nashik Crime News)

तालुक्यात सिंचन क्षेत्र जेमतेम दीड ते दोन टक्के आहे. शेती सिंचनाअभावी अनेक शेतकऱ्यांनी बोअरवेलमध्ये वीज पंप बसवून पिण्याचे पाणी उपलब्ध केले आहे. पिंपळसोंडपैकी उंबरपाडा येथील माजी सैनिक शिवराम चौधरी यांच्या शेतातील वीज पंप व पातळी येथील बाळू धुम यांचा मोटारपंपही चोरट्यांनी लांबविला.

काही दिवसांपूर्वी दोन तरुणांनी रात्री पंपाची वायर दगडाने ठेचून तोडली व पाईप कापून पंप लांबवला. त्यामुळे लागवड केलेली चारशे आंब्याची रोपे पाण्या वाचून सुकून, मरुन जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

उंबरठाणजवळील चिंचमाळ, बर्डा, वांगण (क) या मार्गे चोरट्यांना दुचाकीवरून रात्री अकराच्या सुमारास जाताना वन कर्मचाऱ्यांनी वांगण बर्डाजवळील बाभळीचा माळ येथे पाहिले होते. मात्र, अंधार असल्याने त्यांची ओळख पटली नाही. हा पंप उंबरठाण भागात गेल्याचे समजते. पंप चोरणारी तरुणांची टोळी उंबरठाण, पळसन, बोरगाव, बाऱ्हे, सुरगाणा भागात सक्रिय झाली आहे.

Thieves broke the wire and pipe and stole the pump.
Crime News: सीटवरुन वाद, धावत्या रेल्वेत महिलेला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं, 8 प्रवासी होरपळले

अवैध धंदे वाढले

चिंचमाळ येथील सार्वजनिक विहीरीवरुन दोन, पिंपळसोंड येथील कुंडा रिसोर्ट येथूनही चोरट्यांनी पंप लांबविले आहेत. उंबरठाण ते बर्डीपाडा या सीमावर्ती भागात अवैध धंदे वाढले असून, त्याचा परिणाम तरुण पिढीवर होत आहे.

अनेक तरुण हाताला काम नसल्याने भुरट्या चोरीकडे वळले आहेत. नवी-जूनी दुचाकी घेऊन मोकाट सुटले आहेत. पेट्रोल टाकायला पैसे नसले की अशा चोऱ्या करतात. उंबरठाण गुजरात हद्द, मांधा, गुही, रघतविहीर, कुकूडणे, बर्डीपाडा, पिंपळसोंड, खुंटविहीर या सीमावर्ती भागात पोलिसांनी महिना, पंधरा दिवसातून एकदा तरी गस्त घालून रात्री-अपरात्री दुचाकीवरून फिरणाऱ्यांना विचारणा करीत वचक, दबदबा निर्माण करावा.

आतापर्यंत तालुक्यात शंभरपेक्षा जास्त मोटार पंप चोरट्यांनी लांबविले असतील. मात्र, पोलिसांकडे तक्रार देऊनही तपास केला जात नसल्याने शेतकरी तक्रार करण्यास टाळाटाळ करतात.

"तालुक्यातील शेतकरी कसेतरी पैशाची जमवा जमव करुन मोटार पंप शेतात बसवितात. शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या भुरट्या चोरट्यांची कदापि गय केली जाणार नाही. पंप चोरट्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. शेतकऱ्यांनी तक्रार दाखल करण्यासाठी पुढे यावे."

-संदीप कोळी, पोलीस निरीक्षक, सुरगाणा.

"माझे वय ७५ वर्षे आहे. पाणी टंचाईमुळे एक किलोमीटरवरुन नदीत सिंगल फेज बसवून पाणी आणले होते. चोरटे हे तरुणच असतील. कारण जुनी माणसे वीजेला खुप घाबरतात. दुचाकी व पंप चोरणाऱ्या तरुणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळून शेतकरऱ्यांना त्रास देणाऱ्यांचा बंदोबस्त करावा." -शिवराम चौधरी, माजी सैनिक, पिंपळसोंडb

Thieves broke the wire and pipe and stole the pump.
Nashik Crime News : रौलेट गेममधून 28 लाखांची फसवणूक; ओझरला 7 जणांविरुद्ध गुन्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com