दिंडोरी तालुक्यात चोरट्यांचा धुमाकुळ सुरूच; मंदिरात चोरी व 2 दुकाने फोडली | Latest Crime news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik latest crime news

दिंडोरी तालुक्यात चोरट्यांचा धुमाकुळ सुरूच; मंदिरात चोरी व 2 दुकाने फोडली

दिंडोरी (जि. नाशिक) : तालुक्यातील वणी कसबे येथे शुक्रवारी (ता. २९) मध्यरात्री चोरट्यांनी संखेश्वर मंदिर, महालक्ष्मी इलेक्ट्राॕनिक्स व किराणा दुकानातून ऐवज लांबविला. (Thieves rampage continues in Dindori taluka Theft in temple broke 2 shops nashik Latest Crime news)

वणी- दिंडोरी रस्त्यावर संखेश्वर महातीर्थ हे जैनधर्मीयांचे मंदिर आहे. या मंदिरातील कार्यालयात चोरट्यांनी प्रवेश करून दानपेटी लांबविली. वणी बसस्थानकाबाहेरील ग्रामपालिकेच्या व्यावसायिक संकुलातील महालक्ष्मी मोबाईल व इलेक्ट्राॕनिक्स दुकानाच्या छतालगत असलेली पडदी तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला व जुने व नवे भ्रमणध्वनी व इतर साहित्य लांबविले.

रात्री दोन वाजून ५३ मिनिटांनी चार संशयितांनी दुकानात प्रवेश केला होता व पहाटे चार वाजून ४० मिनिटांनी ते बाहेर आल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले. जुन्या बसस्थानकाबाहेरील किराणा दुकानातून चोरट्यांनी हात साफ केला.

हेही वाचा: डोंबिवली शिवसेना शाखेचे विभाजन शिंदे - ठाकरे गटात झाले विभाजन

एकाच रात्री तीन ठिकाणी चोरट्यांनी चोरी केल्याने भितीचे वातावरण असून, चोरट्यांना लवकरच जेरबंद करण्यात येईल, अशी माहिती सय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांनी दिली.

दरम्यान, संखेश्वर मंदिराच्या दानपेटीतून नऊ हजारांची रोकड, कामगाराचा तीन हजाराचा मोबाईल, महालक्ष्मी इलेक्ट्राॕनिक्स व मोबाईल या दुकानातून ६२ हजार ९०० रुपयांचे ब्ल्यूटूथ, भ्रमणध्वनी बॕटरी, पावर बँक, असा ऐवज चोरीस गेला, तर सुमित बोरा यांच्या दुकानातून साडेचौदा हजारांचा किराणा व रोकड, असा एकूण ८९ हजार चारशे रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. याबाबत जितेंद्र दुसाने यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा: औरंगाबाद : गंगापूर फाट्यावर अपघात, दोन तरुण जागीच ठार

Web Title: Thieves Rampage Continues In Dindori Taluka Theft In Temple Broke 2 Shops Nashik Latest Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..