Latest Crime News | शहरात चोरट्यांनी केल्या 3 दुचाक्या लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bike theft latest marathi news

Nashik Crime News : शहरात चोरट्यांनी केल्या 3 दुचाक्या लंपास

नाशिक : शहर परिसरात सातत्याने दुचाकी चोरीचे प्रकार सुरूच असून तीन दुचाकींची चोरी झाली आहे. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे वाहनचालकांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. तर, दुसरीकडे पोलिसांसमोरही दुचाकी चोरट्यांचे आव्हान उभे राहिले आहे. (Thieves stolen 3 bikes in city Nashik Latest Crime News)

हेही वाचा: Nashik Crime News : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला 6 महिने शिक्षा

विठ्ठल भगवान सोनवणे (रा. मखमलाबाद ) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची दुचाकी (एमएच- १५- सीएच- ८२९३) शनिवारी (ता. १२) कपालेश्वर मंदिरासमोर पार्क केली असता, चोरी झाली. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. संजय विठ्ठलराव कुमावत (रा. जेल रोड) यांच्या फिर्यादीनुसार, १२ नोव्हेंबरला ते किराणा खरेदीसाठी इच्छामणी किराणा, जागृतीनगर येथे रात्री नऊच्या सुमारास गेले होते.

दुकानासमोर पार्क केलेली दुचाकी (एमएच- १५- डीपी- ६५२९) चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी नाशिक रोड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सचिन विष्णू डावरे (रा. पंचक, जेल रोड) यांच्या फिर्यादीनुसार, विनय काजळे (रा. संसरी नाका) यांच्या मालकीची दुचाकी डावरे हे वापरतात. सोमवारी (ता. १४) त्यांनी मुक्तिधाम येथील अस्सुरेड केअर प्लस हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली दुचाकी (एमएच- १५- ईक्यू- ६२९५) चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: Nashik Crime : बेशिस्त वाहनचालकांमुळे गेला दोघांचा बळी; सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल