फोटो- 02416
नगरसूल ः येथे तिसऱ्या धम्म परिषद कार्यक्रमप्रसंगी निघालेली धम्म रॅली.
तिसरी धम्म परिषद
नगरसूल येथे उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
नगरसूल, ता. १ : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात रविवारी (ता. १) तिसरी धम्म परिषद उत्साहपूर्ण व चैतन्यमय वातावरणात पार पडली. भदंत भारद्वाज यांनी धम्मक्रांती बुद्ध विहार, नगरसूल येथे वर्षावासातील तीन महिन्यांचे अधिष्ठान पूर्ण केल्यानिमित्त पवारणा कार्यक्रमाचे औचित्य साधून ही धम्म परिषद झाली. भिक्खू गुणरत्न महास्थवीर, शिलरत्न स्थविर, अमृतानंदबोधी स्थविर, आनंदभुमन सिरी स्थविर, सच्चितबोधी, भद्रराज, आनंदमित्त, धम्मपाल आदी उपस्थित होते.
जगाला युद्ध नको, बुद्ध हवा. समता,शांती आणि करुणेची गरज आहे. हा विचार समाजापर्यंत पोहोचविणे तसेच गौतम बुद्धांचा लोकहिताचा धम्म जगाला कळावा, या उद्देशाने ही परिषद झाली. महाराष्ट्राच्या विविध भागांतून पूज्य भिक्खू संघासह बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळी ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर पूज्य भिक्खू संघाच्या उपस्थितीत सद्धम्म मानवता रॅलीनिघाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. भदंत भारद्वाज व उपस्थित भिक्खू संघाने धम्म देशना देत भगवान बुद्धांच्या विचारांचे महत्त्व विशद केले.
धम्म क्रांती बुद्ध विहार, रमाई महिला मंडळ नगरसूल, पंचशील ग्रुप तसेच संघर्ष मित्र मंडळ, रेल्वे स्टेशन नगरसूल यांच्यातर्फे हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमात धम्मविचार, सामाजिक एकता, बंधुता आणि मानवतेचा संदेश देण्यात आला.
..............