
तिसरी लाट नाशिकच्या दारात; आयुक्त कैलास जाधव यांचे सूतोवाच
नाशिक : शहरात कोरोनाची दुसरी लाट ओसरतं असल्याचे दिसतं असले तरी शेजारील नगर जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दररोज सहाशे ॲक्टीव्ह रुग्ण आढळतं असल्याने कुठल्याही क्षणी नाशिकमध्ये तिसरी लाट (third wave of corona) निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिककरांनी गाफील न राहता कोरोनाचे सर्व नियम पाळून गर्दी टाळावी असे अवाहन महापालिका आयुक्त कैलास जाधव(Kailas Jadhav) यांनी केले.
गाफील राहू नये!
महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी आज खाते प्रमुखांची बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये कोरोनाच्या सद्य परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना आयुक्त जाधव यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटे विषयी चिंता व्यक्त केली. शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. ही बाब खरी असली तरी तिसऱ्या लाट याची शक्यता त्यांनी वर्तवली. पहिली लाट ऑक्टोबर मध्ये ओसरली त्यानंतर हिवाळ्यात दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यासाठी प्रशासनाने तयारी केली. परंतु जानेवारी महिन्याच्या अखेरपासून दुसरी लाट सुरू झाली. हिवाळ्यात दुसरी लाट न आल्याने नागरिक निर्धास्त होते, प्रशासकीय यंत्रणा देखील काही प्रमाणात निर्धास्त होती. परंतू लग्न समारंभ व बाजारपेठांमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने मार्च ते मे महिन्यात दुसरी लाट जीवघेणी ठरली. या लाटेत सुमारे तीन हजार नागरिकांचा बळी गेला.
दुसरी लाट ओसरल्याचे दिसत असले तरी, ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 600 पर्यंत आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेच्या संदर्भात नाशिककरांनी गाफील राहू नये. केरळ राज्यात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या आढळून येत आहे. तर शेजारील नगर जिल्ह्यात दररोज सहाशे ॲक्टिव रूग्ण आढळून येत आहे. तिसर्या लाटेच्या निर्मितीचे संकेत असून लसीकरणाचे दोन डोस घेतल्यानंतरही कोरोणाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोरोनाच्या बाबतीत नागरिकांनी गाफील न राहता नियम पाळण्याचे आवाहन आयुक्त जाधव यांनी केले.
हेही वाचा: भाऊ कॉलेजमध्ये 'जीएस' झाला, अन् कारच विसरुन आला..
त्रिसुत्री आवशक्यचं, नागरिकांची जबाबदारी
मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर राखण्याचे शासकीय नियम नागरिकांनी पाळावे. कोरोनाची तिसरी लाट रोखण्याचे काम नागरिकांना करावयाचे आहे. तिसरा लाटे चा सामना करण्यासाठी महापालिका सज्ज आहे. राज्य सरकारच्या टास्क फोर्स ने सुचविल्या नुसार ऑक्सीजन प्लांट उभे केले जात आहे. रुग्णालयांमधील बेडची संख्या देखील वाढली जात असून लहान मुलांसाठी विशेष कक्ष स्थापन केले जात आहे. अशी माहिती आयुक्तांनी दिली.
हेही वाचा: नाशिककरांसाठी गुड न्युज! एक दिवसाची पाणीकपात मागे
Web Title: Third Wave Of Corona Is Likely To Form In Nashik At Any Moment Said Kailas Jadhav
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..