Nashik : हा तर मोदींचा मोठेपणा : फडणवीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवेंद्र फडणवीस

हा तर मोदींचा मोठेपणा : फडणवीस

नाशिक : ‘‘सर्वांना कृषी कायद्याचे महत्त्व पटविण्यात कमी पडल्याने कायदे मागे घेण्याचा निर्णय पंतप्रधान मोदी यांनी घेताना मनाचा मोठेपणा दाखविला. लोकशाहीत अशा प्रकारचा मोठेपणा फार कमी लोक दाखवितात, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

एका विवाह सोहळ्यानिमित्त फडणवीस शनिवारी नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कृषी संदर्भातील तीन विधेयके मागे घेण्याचा निर्णय म्हणजे मोदींचा मोठेपण असल्याचे सांगत त्यांनी कौतुक केले. टीका करणारे टीका करतात, काम करणारे काम करतात. जे टीका करतात त्यांनी शेतकऱ्यांसाठी काही केले नाही. त्यांची भूमिका दुटप्पी असल्याने लोक त्यांना उत्तरे देतील.

मी राऊतांचे डोके तपासतो : पाटील

‘‘त्यांनी माझी मानसिकता तपासावी, मी त्यांचे डोकं तपासतो. त्यांची स्मृती कमी आहे. काँग्रेसने एक कायदा तीनदा आणला व तिनही वेळेस तो कायदा रद्द करावा लागला, अशी आठवण करून देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर उलटवार केला. परिवहन मंत्री अनिल परब, देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी विधान परिषदेची जागा बिनविरोध करण्यासाठी आले होते. त्यावेळी परब यांना संप कसा मिटविता येईल हे कागद-पेन घेऊन समजावून सांगावे लागल्याची टीका पाटील यांनी केली.

loading image
go to top