येवला: जिल्ह्यातील रब्बी हंगाम पूर्णतः खरिपातील पावसावर अवलंबून असतो. यंदा शेवटच्या टप्प्यात पावसाने कृपा केल्याने जिल्ह्याच्या सर्वच भागांत रब्बीची पिके घेतली गेली. तब्बल एक लाख १५ हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली होती.
गेल्या वर्षाच्या तुलनेत हे क्षेत्र सुमारे ३० हजार हेक्टरने वाढले आहे. शिवाय, वातावरणाने चांगली साथ दिल्याने रब्बीच्या उत्पादनातही वाढ झाल्याचे दिसते. सध्या रब्बी हंगामातील पिके काढण्याची लगबग सुरू असताना दिसते.