असं देशप्रेम दुर्मिळच! शेतकरी कुटुंबातील ठोंबरे बंधुंकडून तरुणांच्या स्वप्नांना बळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

training

देशावरचे प्रेम हे वरवर असून चालत नाही तर ते प्रत्येकाच्या रक्तातच असायला हवं. देशासाठी काहीतरी करुन दाखवण्याचं स्वप्न बाळगून आर्मीत दाखल होणाचा असंख्य तरुण प्रयत्न करत असतात. मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही..

असं देशप्रेम दुर्मिळच! शेतकरी कुटुंबातील ठोंबरे बंधुंकडून तरुणांच्या स्वप्नांना बळ

नाशिक/लासलगाव : देशावरचे प्रेम हे वरवर असून चालत नाही तर ते प्रत्येकाच्या रक्तातच असायला हवं. देशासाठी काहीतरी करुन दाखवण्याचं स्वप्न बाळगून आर्मीत दाखल होणाचा असंख्य तरुण प्रयत्न करत असतात. ग्रामीण भागात अशा तरुणांना योग्य  मार्गदर्शन  मिळत नाही. पिंपळद (ता. चांदवड) येथील सेवेचा वसा घेतलेले शेतकरी कुटुंबातील दीपक ठोंबरे व संदीप ठोंबरे या दोन भावांनी याची दखल घेतली  अन् तरुणांसाठी अनोखा उपक्रम सुरु केला आहे.

पिंपळद येथील शेतकरी कुटुंबातील वाढलेले दोन भाऊ आणि एक बहीण असा छोटा परिवार पिंपळद येथे शेतीवर उपजीविका करत आहे. घरात शैक्षणिक वातावरण असल्याने लहान बहीण सविता लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होऊन मुंबई येथे पोलिस दलात कार्यरत आहे. तर लहान भाऊ दीपक ठोंबरे हा गेल्या दहा वर्षापासून देशसेवेत आर्मीमध्ये कार्यरत असून सध्या तो बेंगलोर येथे कर्तव्य बजावत आहे. हे दोघे बंधू तरुणांना आर्मीमध्ये दाखल होण्यासाठी संपूर्ण तयारी विनामूल्य करून घेत आहे.

दररोज अथक मेहनत

ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती ही देशसेवेत असावी हा उद्देश बाळगून ठोंबरे बंधूंनी 15 ते 22 वयोगटातील 40 विद्यार्थ्यांचा गट तयार केला आहे.  हे सर्वजण दररोज पहाटे पाच ते आठ या वेळेत सर्व मैदानी सराव करतात. मोठे बंधू संदीप हे या तरुणांचा कसून सराव घेतात. तर लहान बंधू रोज बेंगलोर येथुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. त्यांनी तयार केलेल्या व्हाट्सअप ग्रुप वर दररोजची हजेरी बघितली जाते. तसेच रोज पाच किलोमीटर रनिंग व त्यानंतर स्ट्रेचिंग करून घेतले जाते.

सोबतच सामाजिक बांधिलकी

सामाजिक बांधिलकी म्हणून या ग्रुपने गावाच्या परिसरात शंभर वृक्षांची लागवड केली आहे त्यासाठी त्यांना पाणी देणे व स्वच्छता करणे तसेच परिसरातील स्वच्छता या ग्रुपच्या माध्यमातून केली जाते. आर्मीचे बेसिक ट्रेनिंग संदीप घेतो तर दीपक सुट्टीवर आल्यानंतर ॲडव्हान्स ट्रेनिंग घेतले जाते. यावेळी डायट मार्गदर्शनही केले जाते. या कुटुंबाने स्वखर्चातून अभ्यासिका तयार केली असून विद्यार्थ्यांना आर्मी साठी लागणारे सर्व पुस्तके व प्रश्नसंच येथे उपलब्ध केलेले आहे.

गावकऱ्यांची मिळतेय साथ

यांच्या मदतीसाठी गावातील मन्सूर पठाण यांनीही विद्यार्थ्यांसाठी खेळाचे साहित्य उपलब्ध करुन दिले आहे, तसेच राम बोराडे आठवड्यातून एक दिवस या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात, गावामध्ये अद्यावत व्यायामशाळा उभारून जास्तीत जास्त विद्यार्थी आर्मी साठी निवड व्हावी हाच उद्देश या ग्रुपचा आहे. आज पर्यंत दोन वर्षात या ग्रुपचे तीन विद्यार्थी आर्मीमध्ये दाखल झाले असून येणाऱ्या काळामध्ये सात ते आठ विद्यार्थी पात्र होतील असा कयास आहे.

गेल्या अनेक वर्षापासून चांदवड तालुका हा दुष्काळाने होरपळला तालुका मानला जातो पिंपळस सारख्या ग्रामीण भागातून प्रत्येक घरातून एक व्यक्ती देशसेवेत आर्मी च्या माध्यमातून आली पाहिजे हा माझ्या ग्रुपचा मुख्य तो आहे यापुढे पिंपळद गाव हे आर्मीचे गाव म्हणून नावलौकिकात नक्कीच येईल असा मला आत्मविश्वास आहे.
-दिपक ठोंबरे, आर्मी सेवक, बंगळुरु

लहान भावाच्या स्वप्नपूर्तीसाठी त्याने दिलेल्या मार्गदर्शनानुसार मी ग्रुपच्या सर्व विद्यार्थ्यांचे बेसिक ट्रेनिंग घेत असून रोज तीन तास ग्राउंड वर शारीरिक व्यायाम करून घेतो.
ग्रुप साठी ड्रेस कोड हा कंपल्सरी केला असून आर्थिक परिस्थिती नसल्यास त्या विद्यार्थ्यांना कुटुंबियाकडून ड्रेस व शूज मोफत दिले जातात - संदिप ठोंबरे, शेतकरी, पिंपळद

loading image
go to top