Nashik News: हरिहर दिंडी सोहळ्यात हजारो वारकरी सहभागी! पद्माकर पाटलांनी केले नेतृत्व

Crowd of devotees participating in Harihar Dindi festival at Kushavart.
Crowd of devotees participating in Harihar Dindi festival at Kushavart.esakal

हरिहर भेट सोहळा आनंदाने,

सुरू झाला श्री जगन्नाथ कृपेने ।

रित ही सुरू ठेवली प्रेमाने,

रामनाथ, लक्ष्मण नारायण अन दामोदराने ।।

ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या श्री काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजा येथून रविवारी (ता.१०) सकाळी सातच्या सुमारास नाशिक ते त्र्यंबकेश्‍वर हरिहर भेट दिंडी सोहळ्यास प्रारंभ झाला.

श्रावण वद्य एकादशीचे औचित्य साधत आयोजित करण्यात आलेल्या या दिंडी सोहळ्यात हजारो भाविक सहभागी झाले होते. यात जिल्ह्याच्या विविध भागातून आलेले वारकरी भाविकांचा समावेश होता. (Thousands of Varkaris participate in Harihar Dindi celebration Led by Padmakar Patal Nashik News)

जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या दिंडीकऱ्यांनी श्री काळारामाचे दर्शन घेतल्यावर रामतीर्थावर हातपाय धुवून दिंडी सोहळ्याने त्र्यंबकेश्‍वरकडे प्रस्थान ठेवले. तरणतलाव येथे सामाजिक कार्यकर्ते पदमाकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिंडी सोहळ्याचे पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.

त्यानंतर सातपूर येथे सतीश आंबेकर परिवाराने या दिंडी सोहळ्याचे स्वागत केले. याठिकाणी चहापाणी झाल्यावर पिंपळगाव बहुला येथे माधवराव नागरे परिवाराने दिंडी सोहळ्याचे स्वागत केले.

त्यानंतर महिरावणी येथे सोमेश्‍वर महादेव ट्रस्टचे अध्यक्ष मुरलीधर पाटील व महिरावणीचे ग्रामस्थ यांच्यातर्फे फराळवाटप करण्यात आले. पुढे अंजनेरी येथे गोकुळ घोलप परिवाराने दिंडीचे स्वागत केले.

दिंडी सोहळ्यात दामोदर महाराज गावले, तुकाराम नागपुरे, नरहरी उगलमुगले, धर्मराज उगले, बाळा नागरे, खंडू चव्हाणके, पुंडलिक थेटे यांच्यासह हजारो वारकरी बांधव सहभागी झाले होते.

रामदिंडीचे त्र्यंबक नगरीत आमगन झाल्यावर दिंडीक-यांनी कुशावर्तावर हायपाय धुवून प्रथम आरती व अभंग सादर केले. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ समाधीकडे मार्गस्थ झाले. त्यानंतर रात्रपर भजन सोहळा रंगला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Crowd of devotees participating in Harihar Dindi festival at Kushavart.
Dhule News: धुळेकरांसाठी E Bus; मनपासाठी ‘पेट्रोलपंप’चे स्वप्न! महासभेपुढे विषय

गत पाच सहा वर्षांपासून हरिहर भेट दिंडी सोहळ्यास गावकऱ्यांसह जात आहे, अशी माहिती दिंडोरी तालुक्यातील तात्याबा माळी यांनी राममंदिरासमोर दिंडीला प्रारंभ होताना दिली.

रामदिंडीतून आत्मिक समाधान मिळत असल्याने गत दहा वर्षांपासून या सोहळ्याचा आनंद घेत असल्याची माहिती शिलापूरच्या शांताबाई पाटील यांनी दिली.

अशी होते हरिहर भेट

भाविक वारकऱ्यांनी श्री काळाराम मंदिर येथून आणलेली तुळस त्र्यंबकराजास अर्पण केली जाते. तर त्र्यंबकराज येथून घेतलेले बेलपत्र पंचवटीतील श्री काळारामास अर्पण केले जाते. याप्रमाणे हरिहर भेट साजरी होते.

Crowd of devotees participating in Harihar Dindi festival at Kushavart.
Uddhav Thackeray News: देशातील मोदी सरकार 2024 ला हटविणारच : उद्धव ठाकरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com