esakal | नाशिकमधील औद्योगिक क्षेत्रातील हजारो कामगारांचे स्थलांतर
sakal

बोलून बातमी शोधा

Migration

नाशिकमधील औद्योगिक क्षेत्रातील हजारो कामगारांचे स्थलांतर

sakal_logo
By
सतिष निकूंभ

सातपूर (नाशिक) : पहिल्या व दुसऱ्या लॉकडाउननंतर (Lockdown) सातपूर, अंबड, दिंडोरी, इगतपुरी, सिन्नर आदी औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कामगार बेरोजगार झाले आहेत, तर हजारो कामगारांना या काळातील वेतनही मिळाले नाही. यामुळे कामगार आपले बिऱ्हाड खांद्यावर घेऊन गावाकडे स्थलांतरित झाले आहेत. यामुळे सातपूर, अंबड मधील घरे रिकामे झाल्याने घरभाड्यावर उदरनिर्वाह करणारे अनेकांचे कर्जाचे हप्तेही थकल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. (thousands of workers have migrated from the industrial area in nashik)

लॉकडाउनमुळे रोजंदारी, कंत्राटीसह कायम कामगारांच्याही नोकरीवर पाणी फिरले आहे. काहींनी परिवार वाढल्याचे अथवा व्हीआरएस घेऊन व कर्ज काढून घरावर बांधकाम करून दोन पैसे मिळण्याची व्यवस्था केली होती. परंतु, लॉकडाउनमध्ये यातील अनेकांचे रोजगार गेल्याने हातावरील पोट भरणारे भाडे भरून आर्थिक बोजा वाढविण्यापेक्षा गावी स्थलांतरित झाले. यामुळे खोल्या रिकामा झाल्याने अनेकांचे घराचे हप्ते तर काहींचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

दुहेरी संकट

अनेकजण कंत्राटी व भाजीपाल्यासह रस्त्यावर किरकोळ विक्री करून उदरनिर्वाह करत होते. यातील अनेकांनी पंतप्रधान घरकुल योजनेत अडीच लाखाची मदत घेण्यासाठी इन्कमटॅक्स भरून घर घेतले. परंतु, या कुटुंबांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेतून वगळल्याने दुहेरी आर्थिक संकटात सापडले आहे.

मी कंत्राटी कामगार होतो. पण गेल्या सहा महिन्यांपासून काम मिळत नसल्याने घरभाडे ही थकले होते. अजून आर्थिक भार वाढण्यापेक्षा संसार आवरून गावाकडे जात आहे.

- अजित पवार, कामगार

आतापर्यंत कामगार विभागाच्या वेबसाइटवर स्थलांतरित कामगाराची नोंदणी झाली आहे. त्यासाठी जिल्हानिहाय समिती काम पाहत आहे.

- विकास माळी, -कामगार उपायुक्त.

(thousands of workers have migrated from the industrial area in nashik)