नाशिक- पांडवलेणीच्या पायथ्याशी रविवारी (ता.१३) रात्री १७ ते २२ वयोगटातील आठ-दहा मित्रांची पार्टी सुरू असताना मुख्य संशयिताचे नेलेले कबूतर परत आणून न दिल्याच्या कारणातून वाद झाला आणि त्यातून २० वर्षीय युवकाच्या पोटात सुरा भोसकून खून, तर,दुसऱ्यावर धारदार शस्त्राने वार करीत जखमी केले आहे. या प्रकरणी शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने तिघांसह एका अल्पवयीन संशयिताला अटक केली आहे.