तिघे सराईत चैनस्नॅचर जेरबंद; 7 तोळे सोने जप्त

nashik crime marathi news
nashik crime marathi newsesakal

नाशिक : इंदिरानगर परिसरामध्ये महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या (Gold Chain Snatchers) हिसकावून नेणार्या तिघा सराईत सोनसाखळी चोरट्यांना इंदिरानगर पोलिसांनी अटक केली आहे. संशयितांकडून एका दुचाकीसह सात तोळे चोरीचे सोने असा अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. (Three chain snatchers jailed 70 grams of gold seized nashik Latest Crime News)

nashik crime marathi news
नाशिक जिल्हा रुग्णालयच ‘सलाईन’वर; अस्वच्छता, डासांनी कर्मचारी, रुग्ण बेजार

सागर माळी, गणेश लिपणे, महादेव राऊत (सर्व रा. म्हाडा वसाहत, इंदिरानगर) असे अटक करण्यात आलेल्या सोनसाखळी चोरट्यांची नावे असून, तिघेही सराईत गुन्हेगार आहेत. इंदिरानगर परिसरात संशयितांनी चैनस्नॅचिंग केल्याचे पोलीस तपासातून उघड झाले आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये इंदिरानगर परिसरातील चैनस्नॅचिंगच्या गुन्ह्याचा तपास गुन्हेशोध पथक करीत असताना संशयितांची खबर मिळाली होती. त्यानुसार, पथकाने म्हाडा वसाहतीजवळ सापळा रचून संशयित सागर माळी, गणेश लिपणे या दोघांना अटक केली.

संशयित दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने पोलीसी खाक्या दाखविताच संशयितांची गेल्या तीन महिन्यातील चार चैनस्नॅ.िचंगच्या गुन्ह्याची कबुली दिली. तसेच त्यांचा तिसरा साथीदार संशयित महादेव राऊत यास पोलिसांनी हिंगोलीतून अटक केली आहे.

संशयितांकडून चार गुन्ह्यातील ७ तोळे सोने व दुचाकी असा अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक निखिल बोंडे, प्रभाकर पवार, जावेद खान, सागर परदेशी यांच्या पथकाने बजावली.

nashik crime marathi news
MPSC बदललेल्या परीक्षा पद्धतीच्या निर्णयावर आयोग ठाम; उमेदवारांत नाराजी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com