27350 सूरज चौधरी
27351 आकाश शिंदे
27349 प्रफुल्ल वसावे
खो-खो स्पर्धेत एसएनडीच्या
तीन विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर निवड
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता. २८ : जगदंबा एज्युकेशन सोसायटी संचलित बाभूळगाव येथील एस.एन.डी. इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजमधील येथील तीन विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड होण्याचा बहुमान मिळविला आहे.
नाशिक येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत १९ वर्षांखालील वयोगटातून एस.एन.डी. इंग्लिश मीडियम स्कूलच्या तीन विद्यार्थ्यांनी आपल्या खेळातील कौशल्याची छाप पाडली. यामध्ये इयत्ता अकरावीतील प्रफुल सुनील वसावे, तसेच इयत्ता बारावीतील सूरज चौधरी आणि आकाश शिंदे यांचा समावेश आहे. या तिन्ही विद्यार्थ्यांची धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे होणाऱ्या विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
वेग, चपळता, अचूक निर्णयक्षमता आणि सांघिक समन्वय तसेच नियमित सरावाच्या बळावर विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत विभागीय स्तरापर्यंत झेप घेतल्याचे विद्यालयाचे प्राचार्य नीलेश शिंदे यांनी सांगितले. खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेचे संचालक रुपेश दराडे, प्रशासकीय अधिकारी समाधान झाल्टे, सुनील पवार, उपमुख्याध्यापक संदीप पाटील,क्रीडा शिक्षक प्रसाद भोई आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.