सिन्नर- खोपडी येथे राज्यस्तरीय हिंदकेसरी बैलगाडा शर्यतीत राज्यभरातून दोनशेहून अधिक बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. छत्रपती संभाजीनगर येथील बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावून बुलेट बक्षीस मिळविली. दहा एकर क्षेत्रावर ही स्पर्धा रंगली होती. .बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी नाशिकसह छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, ठाणे जिल्ह्यातून शौकीन उपस्थित होते. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश घोलप, भारत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांतर्फे बैलगाडा शर्यत झाली..युवा नेते उदय सांगळे यांच्या हस्ते बुलेट, पल्सर, डीलक्स, ४- ई स्कूटी आदी बक्षिसांचे वितरण करण्यात आले. सकाळी अकराला शर्यतीला सुरवात झाली. सायंकाळी सातपर्यत शर्यत सुरु होती. छत्रपती संभाजीनगर येथील प्रेम भैया सुळके आणि बळिराम पोळे यांच्या बैलगाडीने विजेतेपद पटकावले. .खडकओझर येथील रमेश पगार व अशोक दोने यांच्या बैलगाडीने द्वितीय तर बदलापूर (जि. जालना) येथील मल्हार आणि अंकुश यांच्या बैलगाडीने तृतीय क्रमांक मिळविला. गिरणारे व शिर्डी येथील बैलगाडीने चौथा, वाघोली येथील बैलगाडीने पाचवा तर पुणे येथील बैलगाडीने सहावा क्रमांक पटकावला. बुलढाणा येथील बैलगाडीने सातवा क्रमांक पटकावला..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.