नाशिक- शहर जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढलेला असतांना कालपासून जिल्ह्यातील बागलाण, निफाड, चांदवड, सुरगाणा, सिन्नरसह विविध भागात सायंकाळी वादळी पाउस सुरु झाला आहे.काही वेळापुरता क्षणीक आल्हादायक दिलासा मिळत असला तरी, शेतीसाठी मात्र दणका ठरत आहे..बागलाण पट्ट्यात दणकातळवाडे दिगर ः बागलाण तालुक्याचा पश्चिम पट्ट्यातील तळवाडे दिगरा सह परिसरात तुफानी वारा व विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी गारपीट कांदा, आंबासह भाजीपाल पिकांचे नुकसान प्रचंड नुकसान झाले. शेतात काढून झाकून ठेवलेला कांदाच्या घोड्या वादळी वारा व पावसाने शेतकऱ्यांची धावपळ झाली. गावांचा संपर्क तुटला.तळवाडा सटाणा या रस्त्यावर किकवारी खुर्द जवळ मोठे लिंबाचे झाड कोसळल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला तसेच अनेक छोट्या मोठ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात झाडू म्हणून पडल्यामुळे अनेक रस्ते पांड्याद्या बंद झाल्या तर वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले त्यामुळे बहुतांशी ठिकाणी वीजपुरवठा देखील खंडित झाला आहे. चांदवडला गारपीट.चांदवड ः चांदवड तालुक्यातील दक्षिण पूर्व भागात चारच्या सुमारास झालेल्या गारपीटीने कांदा बियाणे (डोंगळे) प्लॉटचे संपूर्णतः नुकसान झाले. निमोण, सिंग व मेसनखेडा डोणगाव दरेगाव वाकी खुर्द पाटील सोनी सांगवी काजी सांगवी रेडगाव पन्हाळ सळसन भागात जोरदार गारपीटीने डोंगळे तसेच चारा पिकाचे मोठे नुकसान झाले. अनेक झाडे उन्हाळून पडले आहेत. काही भागात विजेचे खांब कोलमडून पडले..डाळिंब बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुमारे अर्धा तास झालेल्या या गारपीटीत सर्वाधिक नुकसान डोंगळे पिकांचे झाले. डोंगळे पीक बियाणे सध्या काढणीस तयार झालेले होते. महिनाभरानंतर खरीप कांद्याची लागवड सुरू होणार असल्याने आता बियाणे कुठून आणायचे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. या वादळी पावसाने अनेक झाडे उन्मळली..देवळ्यात कांद्याचे नुकसानदेवळा : देवळा शहर व तालुक्यात मंगळवार (ता. ६) विजांच्या कडकडाटासह वादळी वारा व अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अचानक आलेल्या हवामान बदलामुळे शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली. पावसामुळे काढणीस आलेला आणि शेतात काढून ठेवलेला कांदा भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. कांदा झाकण्यासाठी अनेकांनी तातडीने शेताकडे धाव घेतली. मात्र काही ठिकाणी वाऱ्याचा जोर इतका होता की झाकलेला कांदाही उघडून भिजला. वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली. वादळाचा जोर इतका होता की मांडव व लग्नसमारंभासाठी उभारलेले मंडप वाऱ्यामुळे उडून गेले तर काही फाटले. देवळा शहरातील चौकात लावलेले बॅनर वाऱ्याने कोसळल्याने महिला थोडक्यात बचावली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.