Nashik News: ना हरकत दाखल्यासाठी मालेगावकरांना नाशिकला हेलपाटे मारण्याची वेळ

No Objection Certificate file photo
No Objection Certificate file photoesakal

Nashik News : येथील उपविभागीय वनविभागाचे कार्यालय नाशिक स्थलांतरित झाल्याने जमीन व्यवहारात ना हरकत दाखल्यासाठी नाशिकला हेलपाटे मारण्याची वेळ मालेगावकरांवर आलेली आहे.

प्रवासाचा आर्थिक भुर्दंड, वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी पर्यायी मार्ग काढण्याची मागणी येथील नागरिक करीत आहे. (Time for Malegaon residents to attack Nashik for no objection certificate Nashik News)

मालेगाव तालुक्यातील वनविभागाचे कार्यालय २५ ते ३० वर्षांपासून येथील दीपक थिएटर समोर होते. जमीन एन.ए करताना वन विभागाचा ना हरकत दाखला गरजेचा असतो. नवीन शर्त, जुनी शर्तबाबत देखील हा दाखला गरजेचा आहे.

जमीन खरेदी विक्री व्यवहारात मालेगाव प्रांत व अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करावा लागतो. अर्ज मंजुरी नंतर सदर कार्यालयातून वन विभागास पत्र दिले जात होते. व लगोलग मालेगाव वन विभाग कार्यालयात जमा करणे सोईस्कर होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

No Objection Certificate file photo
Nashik ZP News: दोष निवारण कालावधीवरून जि. प. प्रशासनाची माघारी!

पूर्वी वन विभाग कार्यालय मालेगावला असल्याने नागरिकांच्या सोयीचे होते. परंतु एप्रिलमध्ये आलेल्या शासन निर्णयानुसार सदर कार्यालय नाशिक येथे स्थलांतरित झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना जमीन व्यवहाराबाबत नाशिकला हेलपाटे मारावे लागत आहे.

तसेच दाखल्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र हे संकेतस्थळच बंद असल्याने नाशिकवारी क्रमप्राप्त होत आहे व प्रवास खर्च, वेळेचा अपव्यय वाढला आहे. त्यामुळे यात पर्यायी मार्ग काढण्याची मागणी मालेगावचे नागरिक करीत आहे.

No Objection Certificate file photo
Water Crisis: उद्भव कोरडे पडल्याने पाणीयोजना बंद! राजापूरला पावसाळ्यात हाल, गावासह वस्त्यावर टॅंकरने पुरवठा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com