नाशिक-'देशात जेव्हा कोणी ओळखत नव्हते तेव्हा आपण त्यांना खांदा दिला.. आधारासाठी. पण आता त्यांना खरोखर खांदा देण्याची वेळ आली आहे. ढोंगी कमळाबाई अन् गद्दारांबाबत पोतडीत’ अजून बऱ्याच गोष्टी आहेत. हळूहळू सर्व मांडेल’ अशी साद दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील संवाद कानी पडताच कार्यकर्त्यांच्या अंगावर शहारे आले.