नाशिक: काठे गल्ली सिग्नलवरून अपहरण करून १५ लाखांची खंडणी उकळल्याप्रकरणी चार महिन्यांपूर्वी दाखल गुन्ह्यातील मुख्य संशयित व टिप्पर गँगचा म्होरक्या मोठा पठाण ऊर्फ शाकीर पठाण यास चाळीसगाव (जि. जळगाव) येथून अटक केली. तीन दिवसांपासून मागावर असलेल्या शहर गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने पाठलाग करीत कारवाई केली आहे.