Malegaon East area narrow lane and small two-storied, three-storied houses, buildings
Malegaon East area narrow lane and small two-storied, three-storied houses, buildingsesakal

Nashik News : नागरी सुविधा पुरविताना दमछाक; मनपात सहाशेहून अधिक पदे रिक्त

Nashik News : मालेगाव महानगरपालिकेचे क्षेत्रफळ मागील काही वर्षात ४६ किलोमीटरपेक्षा अधिक झाले आहे. लोकसंख्येने १० लाखाचा टप्पा ओलांडली आहे. मनुष्यबळ कमतरता हा सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेतील डोकेदुखीचा विषय आहे.

मनपा आकृतिबंधानुसार सहाशेपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. कामकाजाचा सारा भार प्रभारींच्या खांद्यावर आहे. अशा स्थितीत महानगरात नागरी सुविधा पुरविताना प्रशासनाची दमछाक होते.

त्यामुळे हद्दवाढ भागात प्राथमिक नागरी सुविधा पुरविताना प्रशासनावर अधिकचा ताण आलेला आहे. (Tired of providing civic amenities More than six hundred posts vacant in malegaon municipality Nashik News)

शहरात सुमारे १४० हून अधिक झोपडपट्ट्या आहेत. अरुंद रस्ते, अतिक्रमण, वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील खाद्यपदार्थ विक्रेते, अनधिकृत रिक्षा थांबे, प्रमुख मार्गांवर अवैधरीत्या उभे राहणारे ट्रक व अन्य वाहने अशा असंख्य समस्यांचा डोंगर आहे.

त्यातच समस्यांचे निराकरण करण्यास प्रशासनालाही फारसा रस नाही. शहरात पायाभूत सुविधा पुरविताना नाकीनऊ येत असताना हद्दवाढ भागातील त्रुटींचा डोंगरच उभा राहिलेला आहे.

अमृत योजनेंतर्गत हद्दवाढ भागात जलवाहिन्या, जलकुंभ झाले. यामुळे तसेच गिरणा व चणकापूर धरणातील पाणी आरक्षणामुळे परिसराला शुध्द पाणी पुरवठा झाला.

हद्दवाढ झालेल्या भागात गटारी, कचरा, रस्ते, आरोग्य व अग्निशामन सेवा पुरविताना अनंत अडचणी येतात. हद्दवाढीतील तीन गावांमध्ये तर अग्निशामक दलाचा बंब घुसणेही अवघड आहे. शहरातील अनेक झोपडपट्ट्यांमधील अरुंद रस्त्यांमुळे येथे अग्निशामक बंब प्रसंगी रुग्णवाहिका देखील पोचू शकत नाही.

दाट लोकसंख्येचा विचार करता सार्वजनिक स्वच्छतागृह, शौचालय यांची संख्या अत्यल्प आहे. हागणदारीमुक्ती योजनेनंतर घरोघरी शौचालयासाठी भरपूर अनुदानही देण्यात आले. मात्र जागेअभावी यातही अडचणी आल्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Malegaon East area narrow lane and small two-storied, three-storied houses, buildings
Nashik News: आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारातच प्रसूती! कर्मचारी वेळेत न आल्याने नातेवाइकांकडून संताप

यंत्रमाग व्यवसायावर शहराचे अर्थकारण अवलंबून आहे. शहरातील बहुसंख्य यंत्रमाग नागरी वस्तीतच आहेत. यंत्रमाग व्यावसायिक शहराबाहेर यंत्रमाग व्यवसाय हलविण्यास तयार नाहीत. यंत्रमाग व्यवसाय, तसेच विडी, सिगारेटच्या व्यसनामुळे दमा, अस्थमा व कर्करोगाच्या रुग्णांची संख्या याठिकाणी वाढत चालली आहे.

लहान बालके देखील आजारांच्या विळख्यात अडकत आहे. यासाठी यंत्रमाग शहराबाहेर हलविणे, झोपडपट्टीचा आहे त्या जागेवर मुंबईच्या धर्तीवर पुनर्विकास करणे आवश्‍यक आहे.

कचरा डेपोचा प्रश्‍न गंभीर

म्हाळदे शिवारातील कचरा डेपोचा प्रश्‍नही दिवसेंदिवस गंभीर होत आहे. संपूर्ण कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची गरज आहे. येथील गांडुळ खत प्रकल्प सुरळीत चालत नाही. कचऱ्याचे वर्गीकरणही होत नाही. यामुळे हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या काही ग्रामस्थांना आपली परवड झाली.

गड्या आपला गाव बरा असे म्हणण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. शहरातील गावठाणमधील घरे एकमेकाला लागून व गच्च आहेत. शहरातील मध्यवर्ती भागातून मोसम नदी वाहते. मात्र बांधकाम करताना शहरात कोठेही पुर नियंत्रण रेषेचे पालन होत नाही. एकूणच विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्याच्या नावाने बोंब आहे.

Malegaon East area narrow lane and small two-storied, three-storied houses, buildings
Summer Heat : पर्वत रांगा अन्‌ थंड हवेच्या तालुक्यातही उष्णतेची लाट! तापमानाने ओलांडली चाळिशी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com