District Bank Election : जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बॅंक निवडणुक; अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस | Today is last day to file District Government and Parishad Employees Bank Five Year Election Application nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

District Bank Election : जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बॅंक निवडणुक; अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस

District Bank Election : जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बॅंक निवडणुक; अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस

Nashik News : जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बॅंकेची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रीया सुरू झाली असून अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी (ता.२) अंतिम दिवस आहे.

गुरुवारी (ता.१) दिवसभरात सत्ताधाऱ्यांसह विरोधी पॅनलच्या सर्व इच्छुकांनी शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. (Today is last day to file District Government and Parishad Employees Bank Five Year Election Application nashik news)

आतापर्यंत एकूण ११३ अर्ज दाखल झाले आहेत. तर, आतापर्यंत २४३ अर्ज विक्री झाली आहे.जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बॅंकेची पंचवार्षिक निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी पहिले तीन दिवस गर्दी झाली नव्हती.

मात्र, गुरुवारी इच्छुकांची मोठी गर्दी झाली. सत्ताधारी समता पॅनलच्यावतीने विद्यमान संचालक सुधीर पगार, प्रशांत गोवर्धने, दीपक आहिरे, सरिता पानसरे, मंगला ठाकरे, डॉ. शैलेश निकम, शशिकांत वाघ, गणेश वाघ आदींनी अर्ज दाखल केले. पॅनलचे नेते रमेश राख, भाऊसाहेब खताळे, एन. डी. सानप, विजयकुमार हळदे आदी उपस्थित होते. विरोधी गटाच्या सहकार पॅनलनेही रॅली काढत अर्ज दाखल केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यात रवींद्र आंधळे, विक्रम पिंगळे, मोठाभाऊ ठाकरे, प्रमोद निरगुडे, मंदाकिनी पवार, अजित आव्हाड, शेखर पाटील, अनिल घुगे, नीलेश देशमुख, सुनील गिते, महेश मुळे यांनी अर्ज दाखल केले. पॅनले नेते उत्तम गांगुर्डे, दिलीप थेटे, महेश आव्हाड, दिलीप सलादे आदी उपस्थित होते. काही उमेदवारांनी एकाच गटात एकापेक्षा जास्त अर्ज व एकापेक्षा जास्त गटातून अर्ज भरले आहेत. चार दिवसात एकूण २४३ अर्जाची विक्री झाली आहे. अर्ज दाखल करण्याची २ जून ही अंतिम मुदत आहे.

आतापर्यंत दाखल झालेले अर्ज

सर्वसाधारण गट - ५८ अर्ज

तालुक्यातून निवडून द्यायचे प्रतिनिधी - २३ अर्ज

इतर मागास प्रवर्ग - ९ अर्ज

महिला राखीव गट - ६ अर्ज

अनु. जाती/जमाती गट - ७ अर्ज

विमुक्त जाती भटक्या जमाती - १० अर्ज

टॅग्स :Nashikelection