जगाचा संसार सावरण्याचे
सामर्थ्य भारतात ः डॉ. देवकर
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव शहर,ता.१५ : जगाचा संसार सावरण्याचे सामर्थ्य भारतात आहे.याचे बीजारोपण स्वामी विवेकानंदांनी जागतिक सर्व धर्म परिषदेत केले. कुटुंबात, समाजात वैचित्र्य असले तरी आम्ही भारतीय विविध प्रवाहांना एकत्र करून पुढे जात असतो असे प्रतिपादन विवेकानंद केंद्राच्या देवगिरी विभागाचे प्रमुख डॉ.विश्वास देवकर यांनी केले. येथील विवेकानंद केंद्रातर्फे ''विवेकानंदांचे विश्वबंधुत्व आणि २१ व्या शतकातील आव्हाने व संधी’ या विषयावर व्याख्यानात ते बोलत होते. डॉ.सुरेश शास्त्री यांनी म्हटलेल्या तीन ओमकारांनी सुरुवात झाली. नगर प्रमुख संजय पाठक यांनी प्रास्ताविक केले. संस्कार वर्गाच्या विद्यार्थिनींनी ‘चले निरंतर, चिंतन मंथन'' हे गीत सादर केले. नगर सहसंचालक ज्ञानेश्वर भावसार यांनी ‘ विवेकवाणी ’ सादर केली परिचय प्रफुल्ल प्रभुणे यांनी केला. राघव जोशी यांनी सूत्रसंचालन केले.निलेश अमृतकर यांनी आभार मानले. रुपाली येवले,मृदुला महाशब्दे,कुमार सुतवणी, आशीष बोहाडे, विजय येवले, महेश अग्रवाल आदींचे सहकार्य लाभले.
मालेगाव शहर : येथील विवेकानंद केंद्रातर्फे आयोजित व्याख्यानात बोलताना देवगिरी विभागाचे प्रमुख डॉ.विश्वास देवकर.