05010 : यशोदाबाई ठाकरे
05009 : मुरलीधर ठाकरे
पत्नीचा खून करत पतीची आत्महत्या
श्रीपुरवडे येथील घटना; कौटुंबिक वादाची किनार
सकाळ वृत्तसेवा
अंबासन (ता. १५): श्रीपुरवडे (ता. बागलाण) येथे कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची कोयत्याने वार करून खून केला. आणि त्यानंतर स्वतः विषारी औषध प्राशन करून गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. गुरुवारी (ता.
श्रीपुरवडे-जायखेडा रस्त्यालगत शेतात वास्तव्यास असलेले मुरलीधर राघो ठाकरे (वय ६५) व त्यांच्या पत्नी यशोदाबाई मुरलीधर ठाकरे (वय ५८) हे घरी एकटेच होते. त्यांचा मुलगा समाधान ठाकरे व सून एका नातेवाईकाच्या लग्नसमारंभासाठी बाहेरगावी गेले होते. रात्रीच्या वेळी पती-पत्नीमध्ये झालेला वाद विकोपाला गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याच वादातून मुरलीधर ठाकरे यांनी यशोदाबाई यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर, नैराश्यातून मुरलीधर ठाकरे यांनी आधी विषारी औषध घेतले आणि नंतर घरातच गळफास लावून आत्महत्या केली. रात्री आठला वाजेच्या सुमारास जेव्हा मुलगा आणि सून घरी परतले, तेव्हा घरात अंधार होता. वीज सुरू करताच समोर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आई आणि गळफास घेतलेल्या अवस्थेतील वडील पाहून त्यांनी एकच आक्रोश केला.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी पोलिसांना हा प्रकार सांगितला. पोलीस कर्मचारी पृथ्वीराज बारगळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर साहाय्यक पोलिस निरीक्षक सागर काळे आणि विभागीय पोलिस निरीक्षक यशवंत बाविस्कर यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) पथकाने घटनास्थळाचा पंचनामा करून महत्त्वाचे पुरावे संकलित केले.
पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी दोन्ही मृतदेह नामपूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. अत्यंत शोकाकुल वातावरणात श्रीपुरवडे येथे पती-पत्नीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.