फोटो ओळी : 05152
अंबासन : जप्त केलेळे डाळिंब व संशयितांसह पोलिस पथक.
डाळिंब चोरणाऱ्या
तिघांना अटक; एक फरारी
सकाळ वृत्तसेवा
अंबासन, ता. ११ : बिलपुरी (ता. बागलाण) येथील शेतकरी पितांबर पवार यांच्या गट क्रमांक २०/३ मधील बागेतून सुमारे १३५ किलो डाळिंब चोरून चार गोण्यांत भरून दोन दुचाकींवरून मालेगावकडे जात असताना गस्ती पथकाने संशयितांना ताब्यात घेतले. या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले असून, एक संशयित फरारी आहे.
डाळिंब उत्पादक शेतकरी दिलीप पवार यांच्या डाळिंबाच्या बागेतून डाळिंबांची चोरी झाली. बागेतील डाळिंब परिपक्व झाल्याने व्यापाऱ्यांशी विक्रीसंदर्भात बोलणी सुरू होती. काही दिवसांत मालाची विक्री होणार असतानाच चोरट्यांनी बागेतून डाळिंब लंपास केले.
चोरट्यांनी मध्यरात्री बागेतील डाळिंब चार गोण्यांमध्ये भरून दोन दुचाकीने डाळिंब मालेगावला विक्रीसाठी नेले जात असताना वडनेरच्या गस्ती पथकाने त्यांना संशयावरून थांबविले असता चोरट्यांनी चोरीची कबुली दिली. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून दोन दुचाकी आणि १३५ किलो डाळिंब असा ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. एक संशयित फरारी आहे. या प्रकरणी जायखेडा पोलिसांत गुन्हा दाखल असून, हवालदार दीपक शिलावट व पोलिस नाईक भूषण मोरे तपास करीत आहेत.
.......................