गणरायाच्या मूर्तीवर कारागिरांचा अखेरचा हात . बाप्पाच्या आगमनाची लगबग; मूर्तिकारांच्या कामाला वेग

गणरायाच्या मूर्तीवर कारागिरांचा अखेरचा हात . बाप्पाच्या आगमनाची लगबग; मूर्तिकारांच्या कामाला वेग
Published on
ॲंकर गणरायाच्या आगमनासाठी मूर्तिकारांची लगबग ------------------------------------- कसमादे भागात ग्रामीण कलाकार तयारीत व्यस्त शरद भामरे सकाळ वृत्तसेवा जुनी शेमळी, ता. ३ : गणेशोत्सवाला अवघे बारा दिवस उरल्याने गणरायाच्या आगमनाची चाहूल लागली असून, शहरासह ग्रामीण भागातील मूर्तिकारांच्या कार्यशाळांमध्ये लगबग वाढली आहे. विविध आकारांच्या आकर्षक गणेशमूर्तींवर अखेरचा हात फिरविला जात असून, रंगकाम, सजावट, मुकुट, दागिने आणि नक्षीकाम पूर्ण करण्यासाठी कारागिरांची दिवसरात्र धावपळ सुरू आहे. गणेशोत्सवासाठी दरवर्षी विविध आकारांच्या व आकर्षक स्वरूपातील गणेशमूर्तींना मोठी मागणी असते. यंदाही घरगुती तसेच सार्वजनिक मंडळांसाठी मूर्ती तयार करण्याचे काम काही महिन्यांपासून सुरू आहे. सुरुवातीला मातीपासून मूर्तीचा सांगाडा तयार करून त्यावर बारीक नक्षीकाम करण्यात आले. त्यानंतर मूर्तीला आकार देणे, वाळविणे, रंगकाम आणि अंतिम सजावटीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. गणरायाला आकर्षक रूप देताना कारागीर मूर्तीच्या चेहऱ्यावरील भाव, डोळे, मुकुट, हातातील आयुधे तसेच वस्त्रालंकार याकडे बारकाईने लक्ष देत आहेत. मूर्ती अधिक सुंदर व देखणी दिसावी यासाठी विविध रंगछटा आणि पारंपरिक सजावटीचा वापर केला जात आहे. गणेशोत्सव जवळ येत असल्याने मूर्तिकारांच्या कार्यशाळांमध्ये कामाचा वेग वाढला आहे. तयार झालेल्या मूर्ती सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून, ग्राहकांकडून मूर्तींची आगाऊ नोंदणीही केली जात आहे. पुढील काही दिवसांत रंगकाम व अंतिम सजावट पूर्ण करून मूर्ती ग्राहकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांकडून शाडू मातीच्या तसेच नैसर्गिक रंगांचा वापर केलेल्या गणेशमूर्तींना पसंती मिळत आहे. त्यामुळे मूर्तिकारांकडूनही पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्यावर भर दिला जात आहे. कोट ‘बाप्पाच्या आगमनाला आता अवघे काही दिवस उरल्याने कामाचा वेग वाढविला आहे. मूर्तीची घडण, रंगकाम आणि सजावट यातील प्रत्येक टप्पा काळजीपूर्वक पूर्ण केला जात आहे. भक्तांच्या पसंतीस उतरतील अशा सुंदर आणि आकर्षक मूर्ती तयार करण्याचा प्रयत्न आहे.’ — समाधान आहिरे, मूर्तिकार किरातवाडी : गणपती मूर्तीवर अखेरचा हात फिरविताना समाधान आहिरे ( (छायाचित्र शरद भामरे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com