बागलाण तालुका शिक्षक संघातर्फेआदर्श शिक्षिका माधुरी पवार यांचा सत्कार

बागलाण तालुका शिक्षक संघातर्फेआदर्श शिक्षिका माधुरी पवार यांचा  सत्कार
Published on
फोटोसह संक्षिप्त ----------- आदर्श शिक्षिका पुरस्काराबद्दल माधुरी पवार यांचा सत्कार जुनी शेमळी, ता. ५ : अजमीर सौंदाणे (ता. बागलाण) येथील जिल्हा परिषद शाळेतील तंत्रस्नेही शिक्षिका माधुरी पवार यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल बागलाण तालुका शिक्षक संघातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. पवार यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण देताना विविध शैक्षणिक उपक्रम राबविले आहेत. संगणक, डिजिटल साधने तसेच विविध तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांना विषय समजण्यास सुलभ व्हावे, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.बागलाण तालुका शिक्षक संघातर्फे तालुका शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष विनोद गायकवाड, सरचिटणीस संतोष सावंत व जिल्हा प्रतिनिधी दीपक भामरे यांच्या हस्ते पवार यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी संघाचे चिटणीस संजय पगार, व्ही. टी. पवार, शरद भामरे, राजेंद्र पाटील, मुख्याध्यापक रमेश आहिरे, संदीप खैरनार, जनार्दन वाघ, शीतल पगार आदी उपस्थित होते. अजमीर सौंदाणे ः माधुरी पवार यांचा सत्कार करताना पतसंस्थेचे अध्यक्ष विनोद गायकवाड, संतोष सावंत, दीपक भामरे, व्ही. टी. पवार, संजय पगार, राजेंद्र पाटील आदी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com