बिबट्याने केली म्हैस फस्त:- घटनास्थळी वनविभागाकडून पंचनामा

बिबट्याने केली म्हैस फस्त:- घटनास्थळी वनविभागाकडून पंचनामा
Published on
बिबट्‍याच्या हल्ल्यात म्हशीचा मृत्यू ब्राह्मणगाव : येथील शेतकरी धनंजय प्रकाश अहिरे यांच्या घराजवळ रविवारी मध्यरात्री बिबट्याने हल्ला करून म्हैस ठार केली. वनरक्षक विशाल अहिरे, वनपाल कारभारी बोरसे यांनी पंचनामा केला. ब्राह्मणगाव शेतशिवार परिसरात बिबट्याने यापूर्वीही अनेक जनावरांचा फडशा पाडला असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकरी धनंजय अहिरे, प्रहार संघटनेचे नेते राजेंद्र अहिरे यांनी वनविभागाचे वनरक्षक विशाल अहिरे, वनकर्मचारी कारभारी बोरसे यांच्याकडे केली आहे.
Marathi News Esakal
www.esakal.com