BSW26B11880
भुसावळ : परिचारिकांच्या सत्कारप्रसंगी प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे आदी.
------------
पालिका रुग्णालयातील
परिचारिकांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
भुसावळ, ता. १४ : येथील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे जागतिक परिचारिका दिनानिमित्त पालिका रुग्णालयातील परिचारिकांचा मंगळवारी (ता.१२) विशेष सत्कार करण्यात आला. प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, आरोग्य सभापती मेघा वाणी, डॉ. कीर्ती फलटणकर, डॉ. जैन, नगरसेविका सोनल महाजन उपस्थित होत्या.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सर्व परिचारिकांना हळदी कुंकू, ओटी व भेटवस्तू देऊन सन्मानीत करण्यात आले. परिचारिकांनी कोरोनासारख्या कठीण काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दिलेल्या सेवेमुळे समाज त्यांचा सदैव ऋणी राहील, अशी भावना शैलजा नारखेडे यांनी यावेळी व्यक्त केली. प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी परिचारिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमासाठी प्रतिष्ठा महिला मंडळाच्या सदस्या अनिता आंबेकर, वैशाली सैतवाल यांनी परिश्रम घेतले.