नाशिक रोड–शिर्डी दुहेरी रेल्वेमार्गाला शेतकऱ्यांचा विरोध; पर्यायी मार्गाच्या पुनर्सर्वेक्षणाची मागणी

नाशिक रोड–शिर्डी दुहेरी रेल्वेमार्गाला शेतकऱ्यांचा विरोध; पर्यायी मार्गाच्या पुनर्सर्वेक्षणाची मागणी
Published on
CHE26B16979 मुंबई : मध्य रेल्वेचे सहाय्यक अभियंता (बांधकाम) यांना निवेदन देताना माजी खासदार हेमंत गोडसे आदी. ३०-२ नाशिक रोड-शिर्डी दुहेरी रेल्वेमार्गाला शेतकऱ्यांचा विरोध ----------- पर्यायी मार्गाच्या पुनर्सर्वेक्षणाची मागणी -------- सकाळ वृत्तसेवा नाशिक रोड, ता. २६ : नाशिक रोड-साईनगर शिर्डी प्रस्तावित दुहेरी रेल्वेमार्गासाठी होणाऱ्या भूसंपादनाला बाधित शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुंबई येथे मध्य रेल्वेच्या सहाय्यक अभियंता (बांधकाम) यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले. प्रस्तावित रेल्वेमार्गासाठी होणाऱ्या भूसंपादनामुळे अनेक शेतकरी, नागरिक आणि रहिवासी बाधित होणार आहेत. सुपीक शेती, घरे, विहिरी, फळबागा तसेच शेतीपूरक व्यवसायांवर त्याचा परिणाम होणार असल्याने परिसरात नाराजीचे वातावरण आहे. यापूर्वीही विविध आंदोलने, निवेदने आणि बैठकीतून शेतकऱ्यांनी आपला विरोध नोंदविला आहे. निवेदनात इंडियाबुल कंपनीकडून यापूर्वी संपादित करण्यात आलेल्या जमिनींच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध पर्यायी मार्गाचा सखोल अभ्यास करून रेल्वेमार्गाचे पुनर्सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे. विद्यमान मार्गामुळे मोठ्या प्रमाणात होणारे नुकसान टाळण्यासाठी कमी बाधित होणारा पर्याय स्वीकारावा, अशी भूमिका शेतकरी प्रतिनिधींनी मांडली. शेतकरी प्रतिनिधींनी संभाव्य नुकसान, उपजीविकेवरील परिणाम आणि भविष्यात उद्भवणाऱ्या आर्थिक संकटांची माहिती अधिकाऱ्यांसमोर मांडली. विजय जाधव, कैलास टिळे, विश्वास टिळे, गणेश टिळे, अनिल टिळे, बबन नागरे, रामदास मानकर, दत्तू मानकर, दिनू नागरे, दत्तू नागरे, लक्ष्मण ढोकणे, गणेश कटाळे, लखन टिळे, माणिक मानकर आणि अंकुश टिळे यांनी पर्यायी मार्गाचा गांभीर्याने विचार करण्याची मागणी केली. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या विषयाची दखल घेत सकारात्मक प्रतिसाद दिला. पर्यायी मार्गासंदर्भातील निवेदन व माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत तातडीने पोहोचविण्यात येईल तसेच यासंदर्भात लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला देण्यात आले. ------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com