मुख्य पान-३ साठी
-------------
फोटो CHE26B17642
खेरवाडी ः रेल्वे ट्रॅकच्या मजबुतीकरणाचे सुरू असलेले काम.
-----------
३०-२
कुंभमेळ्यापूर्वी खेरवाडीत
रेल्वे ट्रॅकचे मजबुतीकरण
------------
मुंबईकडील क्रॉसओव्हर हटविण्याचे काम
-----------
नाशिक रोड, ता. १५ : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने रेल्वेच्या पायाभूत सुविधा बळकट करण्यास सुरुवात केली आहे. कुंभमेळ्यात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षित, सुरळीत आणि कार्यक्षम रेल्वे वाहतुकीसाठी विविध ट्रॅक सुधारणा कामे हाती घेण्यात आली आहेत.
-------------
खेरवाडी यार्डमध्ये रविवारी (ता. १३) दुपारी १.१० ते ३.४० या कालावधीत संयुक्त अप-डाउन लाइन ब्लॉक घेऊन प्रमुख ट्रॅक कामे करण्यात आली. ब्लॉकदरम्यान मुंबईकडील बाजूस असलेला विद्यमान क्रॉसओव्हर हटविण्याचे काम करण्यात आले. यासाठी आधुनिक ट्रॅक यंत्रांसह कुशल मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते. त्याच वेळी भुसावळकडील बाजूस टीडब्ल्यूएस (थिक वेब स्विच) तसेच क्रॉसिंग इन्सर्शनचे काम हाती घेण्यात आले. अभियांत्रिकी आणि परिचालन विभागाच्या पथकांनी समन्वयाने कामाचे नियोजन केले. निर्धारित ब्लॉकच्या कालावधीत कामे पूर्ण करून रेल्वे वाहतूक वेळेत पूर्ववत करण्यावर भर देण्यात आला.
कुंभमेळ्याच्या काळात नाशिककडे येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर रेल्वेमार्गाची क्षमता, सुरक्षितता आणि परिचालन कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने ही कामे महत्त्वाची मानली जात आहेत. आधुनिक यंत्रसामग्री, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि नियोजनबद्ध कार्यवाहीच्या माध्यमातून भुसावळ विभागाकडून कुंभपूर्व तयारीला वेग देण्यात आला आहे.
-----------------