अतिक्रमण विभागाचे अमित पवार यांच्या उपस्थितीवरून नगरसेवक संतप्त; सर्वपक्षीय सभात्याग

अतिक्रमण विभागाचे अमित पवार यांच्या उपस्थितीवरून नगरसेवक संतप्त; सर्वपक्षीय सभात्याग
Published on
फोटो : B17664 नाशिक रोड : नगरसेवक शैलेश ढगे, कैलास मुदलीयार, प्रशांत दिवे हे सभागृहात अमित पवार उपस्थित राहिल्याच्या मुद्दा मांडताना. -- नाशिकरोड प्रभाग समितीची सभा तहकूब सर्वपक्षीय सभात्याग; निलंबनाचा ठराव असलेल्या लिपिकाची बैठकीला हजेरी नाशिकरोड, ता. १५ : नाशिक रोड प्रभाग समितीच्या बैठकीत अतिक्रमण निर्मूूलन विभागाचे लिपिक अमित पवार यांच्या उपस्थितीवरून मंगळवारी (ता. १५) चांगलाच गदारोळ झाला. दोन महिन्यांपूर्वीच्या प्रभाग समितीच्या बैठकीत पवार यांच्याबाबत निलंबनाचा ठराव करण्यात आला असतानाही ते बैठकीला उपस्थित राहिल्याने नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षासह सर्वपक्षीय नगरसेवकांनी सभात्याग केल्याने अखेर प्रभाग समितीची सभा तहकूब करण्यात आली. नाशिक रोड येथील महापालिकेच्या विभागीय कार्यालयात सभापती रमेश धोंगडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग समितीची तिसरी बैठक झाली. नगरसचिव संजय नेरकर व विभागीय अधिकारी प्रज्ञा त्रिभुवन यांच्या उपस्थितीत बैठक सुरू झाली. प्रारंभी नगरसेवक शैलेश ढगे यांनी अमित पवार यांच्या उपस्थितीचा मुद्दा उपस्थित केला. यापूर्वीच्या बैठकीत पवार यांच्याबाबत निलंबनाचा ठराव झालेला असताना ते पुन्हा बैठकीला उपस्थित कसे राहिले, असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे सभागृहातील वातावरण तापले. भाजपचे नगरसेवक प्रशांत दिवे यांनी ढगे यांच्या भूमिकेला समर्थन दिले. पवार यांच्या उपस्थितीबाबत निषेध नोंदवत त्यांनी सभात्याग केला. त्यानंतर इतर नगरसेवकांनीही त्यांना पाठिंबा देत सभागृहातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. नगरसेवकांच्या सभात्यागानंतर सभापती धोंगडे यांनी सभा दहा मिनिटांसाठी तहकूब केली. त्यानंतर नगरसेवकांनी सभापतींच्या दालनात एकत्र येऊन पवार यांच्या उपस्थितीबाबत चर्चा केली. संबंधित अधिकाऱ्याच्या प्रश्नावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी नगरसेवकांनी केली. या वेळी सभापती धोंगडे यांनी वरिष्ठ पातळीवर चर्चा करून दोन दिवसांत याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे नगरसेवकांना सांगितले. मात्र, पवार यांच्या नियुक्तीबाबत अथवा उपस्थितीबाबत ठोस निर्णय होईपर्यंत प्रभाग समितीची बैठक घेऊ नये, अशी भूमिका नगरसेवकांनी घेतली. त्यामुळे अखेर सभा तहकूब करण्यात आली. तहकूब झालेली सभा सोमवार (ता. २१) सायंकाळी चार वाजता होणार आहे. बैठकीस नगरसेवक केशव पोरजे, कैलास मुदलियार, योगेश भोर, योगेश गाडेकर, विशाल संगमनेर, सतीश निकम, रंजना बोराडे, मंगला आढाव, सीमा ताजणे, संजीवनी हांडोरे, जयश्री गायकवाड, कोमल मेहरोलिया, वैशाली दानी, श्वेता भंडारी, रुचिरा साळवे यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com