एकलहरे वीज केंद्राच्या मुख्य अभियंता पदी रवींद्र सोनकुसरे

एकलहरे वीज केंद्राच्या मुख्य अभियंता पदी रवींद्र सोनकुसरे
Published on
फोटो CHE26B17727 एकलहरे औष्णिक वीज केंद्राच्या मुख्य अभियंतापदी सोनकुसरे सकाळ वृत्तसेवा नाशिक रोड, ता. १८ : एकलहरे येथील नाशिक औष्णिक वीज केंद्राच्या मुख्य अभियंतापदी रवींद्र महादेव सोनकुसरे यांची पदोन्नतीने नियुक्ती झाली. त्यांनी २ सप्टेंबरपासून मुख्य अभियंता पदाची सूत्रे स्वीकारली. सोनकुसरे यांनी एम. ई. (मॅकेनिकल) पदवी घेतल्यानंतर सरळसेवा भरतीद्वारे २ सप्टेंबर २०२३ रोजी महानिर्मिती कंपनीत सेवेत प्रवेश केला. सुरुवातीला त्यांनी भुसावळ औष्णिक वीज केंद्रात उपमुख्य अभियंता म्हणून २ सप्टेंबर २०२३ ते १ जून २०२५ या कालावधीत काम पाहिले. त्यानंतर महाऔष्णिक वीज केंद्र, चंद्रपूर येथे २ जून २०२५ ते १ सप्टेंबर २०२६ या कालावधीत उपमुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते. मुख्य अभियंता भूषण शिंदे यांची खापरखेडा येथे बदली झाल्यानंतर महानिर्मिती प्रशासनाने सोनकुसरे यांची पदोन्नतीने एकलहरे येथे नियुक्ती केली. वीजनिर्मिती क्षेत्रातील तांत्रिक कामकाजाचा अनुभव असलेल्या सोनकुसरे यांच्याकडून केंद्राच्या कार्यक्षमतेत वाढ आणि वीजनिर्मितीला चालना देण्यासाठी प्रयत्न अपेक्षित आहेत. सोनकुसरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर एकलहरे, सामनगाव, कोटमगाव, हिंगणवेढे, ओढा, शिलापूर तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष निवृत्ती चाफळकर, लोकनियुक्त सरपंच अरुण दुशिंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस राजाराम धनवटे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आसाराम शिंदे, पत्रकार संघाचे शरदचंद्र खैरनार तसेच वीज केंद्रातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सोनकुसरे यांचा सत्कार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com