नाशिकरोड ला अतिक्रमण मोहीम

नाशिकरोड ला अतिक्रमण मोहीम
Published on
17781 नाशिक रोड : अतिक्रणम मोहिमेत हातगाडे उचलून नेतांना महापालिका कर्मचारी नाशिक रोडला किरकोळ अतिक्रमणांवर कारवाई मुक्तिधाम परिसरातील अतिक्रमणे जैसे थे; नागरिक संतप्त सकाळ वृत्तसेवा नाशिक रोड, ता. २२ : प्रभाग समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी अतिक्रमणाच्या प्रश्नावर प्रशासनाला जाब विचारल्यानंतर मंगळवारी (ता.२२) अतिक्रमण निर्मुलन विभागाने अतिक्रमण धारकांवर कारवाई केली. यात रेजिमेंटल प्लाझाच्या पाठीमागील गायकवाड मळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक परिसरातील फूल विक्रेते, टपऱ्या, हातगाडे आणि फलक हटविण्यात आले. मात्र, शहरातील काही प्रमुख ठिकाणी असलेली अतिक्रमणांवर कारवाई न केल्याने याबाबत नागरिकांनी कारवाईबाबत दुजाभाव केल्याचा आरोप केला. सोमवारी (ता.२१) सभापती रमेश धोंगडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत नगरसेविका जयश्री गायकवाड आणि सीमा ताजणे यांनी अतिक्रमणाच्या प्रश्नावर प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाने रेजिमेंटल प्लाझा, गायकवाड मळा परिसरातील फुटपाथ तसेच दुकानांसमोरील टपऱ्या, हातगाडे आणि फलक हटविण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक परिसरातील फूल विक्रेते आणि पूजेचे साहित्य विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली. दरम्यान, कारवाई झाल्यानंतर काही वेळातच काही ठिकाणी पुन्हा अतिक्रमणे दिसून आली. कारवाईदरम्यान काही टपरीधारक व हातगाडीचालकांनी विरोध केला. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाच्या मुख्याधिकारी सुवर्णा दखणे आणि नाशिक रोड विभागाचे अतिक्रमण अधिकारी विवेक काकडे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली. -------- समान कारवाई करण्याची मागणी नाशिक रोड परिसरातील प्रमुख रस्ते व फुटपाथ अतिक्रमणमुक्त करण्याची मागणी सातत्याने होत आहे. मुक्तिधाम परिसर, सोमानी उद्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, वास्को चौक, विभागीय कार्यालय परिसर आणि इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या भिंतीलगतची अतिक्रमणे अद्याप कायम आहेत. त्यामुळे किरकोळ अतिक्रमणांवर कारवाई करण्याबरोबरच प्रमुख ठिकाणांवरील अतिक्रमणावरही समान निकषाने कारवाई करावी, अशी नागरिकांनी अपेक्षा व्यक्त केली. आजच्या कारवाईत प्रशासनाने दुजाभाव केल्याचा आरोपही कारवाई दरम्यान नागरिकांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com