पान-१ ॲंकर
-----------
CHH26B02781 CHH26B02782
चिचोंडी (ता.येवला) : येथील उन्हाळी बालसंस्कार शिबिरात रमलेले विद्यार्थी.
------------------------
३६-४
मुले रमलीत हरिपाठ, मृदंग अन तबलावादनात!
----------------
चिंचोडी येथे वारकरी संप्रदायाचे शिक्षण देणारे निवासी उन्हाळी शिबिर सुरू
----------------
सकाळ वृत्तसेवा
चिचोंडी, ता. १४ : मुलांमध्ये आध्यात्माची गोडी निर्माण व्हावी व आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी या हेतूनेच दरवर्षी मे महिन्यात येथील संत निवृत्तीनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे भाऊसाहेब खराटे व त्यांच्या पत्नी सोनाली खराटे या उन्हाळ्यात दरवर्षी पंधरा दिवसांचे बालसंस्कार शिबिर भरवतात. त्यातून मुलांना वारकरी संप्रदायाचे संपूर्ण शिक्षण दिले जाते. यंदाही हे शिबिर उत्साहात सुरू आहे.
------------
या शिबिरात मुलांना संत- महंतांच्या नीती-मूल्यांची शिकवण दिली जाते. त्याचबरोबर वारकरी संप्रदायाचे संपूर्ण शिक्षण दिले जाते. अभंग, भगवद्गीता, कीर्तन, भजन, संगीत, मृदंग वादन, तबलावादनही मुलांना शिकवले जाते. विविध विषयांवर व्याख्यान दिले जाते. पहाटे मृदंग वादनाचा सराव, प्रार्थना, हनुमान चालिसा, विष्णुसहस्रनाम व गीतापाठ, मृदंग प्रशिक्षण, दुपारी भजन प्रशिक्षण, विविध विषयांवर व्याख्याने व संत चरित्रे, विविध खेळ, सायंकाळी हरिपाठ, पावली प्रशिक्षण दिले जाते. या शिबिरात निवासी स्वरूपात ४० विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. खराटे दांपत्य ना नफा ना तोटा या तत्त्वावर हे शिबिर चालवतात. लोकांनी दिलेल्या देणगीतून त्यांचा खर्च भागवतात. शिबिरासाठी संगीता चव्हाण, सचिन जाधव, पारस नेटके, नितीन मडवई, मयूर येवले, भरत गाडीवान यांच्यासह ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे शिबिर यशस्वी होण्यास मदत मिळत असल्याचे महाराजांनी सांगितले.
------
कोट
तरुणांना व्यसनांपासून दूर करण्याचा प्रयत्न आहे. शाळकरी मुलांचे आध्यात्मिक ज्ञान वाढावे आणि आपली संस्कृती टिकून राहावी, सध्या आधुनिकतेच्या नावाखाली तरुणाई व्यसनाकडे वळली आहे. लहान वयातच त्यांच्यावर योग्य संस्कार झाले तर ते व्यसनांपासून दूर राहू शकतात. वारकरी संप्रदाय वाढवणे, मुलांमध्ये बालवयापासून शुद्ध आचरण वाढवणे हा मुख्य हेतू आहे.
- भाऊसाहेब महाराज खराटे, चिचोंडी
-----