बिबट्याचा फोटो टाका
------------------------
चिचोंडी खुर्द परिसरामध्ये
दिसली बिबट्याची पिले!
-------------
पिंजरा लावला, मात्र शेतकऱ्यांत भिती
-------------
सकाळ वृत्तसेवा
चिचोंडी ता. ७ : चिचोंडी खुर्द (ता. येवला) येथील ३६ चारीलगत दीपक कोऱ्हाळे आणि किरण जोशी यांच्या शेताच्या बांधाजवळ बिबट्याची दोन पिल्ले दिसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
चिचोंडी खुर्द येथील उदय जोशी हे शेत नांगरत असताना बांधाकडे गवतामध्ये त्यांना एक प्राणी दिसून आला, मात्र कुत्रा असेल असे समजून त्यांनी दुर्लक्ष केले. मात्र दुसरा चक्कर मारल्यानंतर पुन्हा ट्रॅक्टर त्या ठिकाणी गेल्यावर बिबट्या पिलाला घेऊन जाताना दिसला, त्यामुळे घाबरलेल्या उदय जोशी यांनी शेजारील शेतकऱ्यांना फोन करत या घटनेची माहिती दिली. दरम्यान येथील किरण जोशी, योगेश चव्हाणके, सोमनाथ मढवई, दत्तू मढवई, दीपक कोल्हाळे यांनी बांधाकडे जात मका पिकाच्या कडेला झाडाखाली पाहिले असता त्या ठिकाणी बिबट्याची दोन पिल्ले दिसून आली. दरम्यान योगेश चव्हाणके यांनी तात्काळ वनविभागाला माहिती कळवली. वनविभागाचे कर्मचारींनी देखील घटनास्थळी येत पाहणी करून ताबडतोब पिंजरा लावला. शेजारील शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. वीज वितरण कंपनीने पुन्हा रात्रीचे भारनियमन सुरू केल्याने रात्री दीडला लाईट येते व पाऊस नसल्याने पिकांना पाणी द्यायला रात्री जावे लागते. आता बिबट्याच्या दहशतीमुळे पाणी कसे द्यावे अशी भीती ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे दरम्यान परिसरातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन वनाधिकारी राहुल घुगे यांनी केले आहे.
----