ऑनलाईन औषध विक्रीविरोधात २० मे भारत बंद;

ऑनलाईन औषध विक्रीविरोधात २० मे भारत बंद;
Published on
अँकर --- CHM26B03524 दोंडाईचा ः ऑनलाइन औषध विक्रीविरोधात २० मेस भारत बंदबाबत पालकमंत्री जयकुमार रावल यांना निवेदन देताना केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट असोसिएशन पदाधिकारी जितेंद्र गिरासे, संजय दुग्गड, आशिष अग्रवाल, भावना सनेर, हुकूमचंद जैन, प्रवीण राजपूत आदी. --- ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी भारत बंद केमिस्ट संघटनेचे पालकमंत्री जयकुमार रावल यांना निवेदन सकाळ वृत्तसेवा चिमठाणे, ता. १५ ः बेकायदेशीर ऑनलाइन औषध विक्री व ई-फार्मसीच्या विरोधात २० मेस पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट असोसिएशन व शिंदखेडा तालुका केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे राजशिष्टाचार व पणनमंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे, की बेकायदेशीर ऑनलाइन औषध विक्रीमुळे सर्वसामान्य रुग्णांच्या आरोग्याशी खेळ सुरू असून, सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळू नयेत अशी औषधेही ई-फार्मसीच्या माध्यमातून सहज उपलब्ध होत असल्याने रुग्णाचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ‘प्रिडेटरी प्राइस’ व ‘डीप डिस्काउंट’च्या माध्यमातून किरकोळ औषध विक्रेत्यांना संपविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. २८ ऑगस्ट २०१८ ची जीएसआर ८१७ (ई), तसेच २६ मार्च २०२० ची जीएसआर २२० (ई) अधिसूचना तत्काळ मागे घेण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. औषधी व सौंदर्यप्रसाधने कायदा १९४०, तसेच त्याअंतर्गत असलेल्या १९४५ च्या नियमांचे उल्लंघन करून ई-फार्मसी प्लॅटफॉर्मद्वारे अनियंत्रित पद्धतीने औषध विक्री होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पालकमंत्री जयकुमार रावल यांनी निवेदन स्वीकारून संबंधित मागण्यांबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. या वेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य जितेंद्र गिरासे, संजय दुग्गड, आशिष अग्रवाल, भावना सनेर, शिंदखेडा तालुकाध्यक्ष हुकूमचंद जैन, सचिव प्रवीण राजपूत यांच्यासह अन्य केमिस्टबांधव उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com