चाळीसगाव येथे महिलेच्या घरात १९ तलवारींसह सापडले ११ चाकू पोलिसांची धडक कारवाई चाळीसगांव पोलिसांकडून कडुन शहरात कोबींग ऑपरेशन

चाळीसगाव येथे महिलेच्या घरात १९ तलवारींसह सापडले ११  चाकू पोलिसांची धडक कारवाई   चाळीसगांव पोलिसांकडून  कडुन  शहरात  कोबींग ऑपरेशन
Published on
CSG26B02680 चाळीसगाव ः शहर पोलिसांनी जप्त केलेल्या हत्यारांसोबत संशयित महिला आरोपी. --- महिलेकडे सापडल्या १९ तलवारींसह ११ चाकू --- ‘कोबिंग ऑपरेशन’दरम्यान चाळीसगाव पोलिसांची कारवाई सकाळ वृत्तसेवा चाळीसगाव, ता. २४ ः येथील पोलिसांनी बुधवारी (ता. २४) राबविलेल्या ‘कोंबिंग ऑपरेशन’दरम्यान शहरातील धुळे रोडवर राहणाऱ्या एका महिलेच्या घरात तब्बल १९ तलवारी व ११ चाकूसह लहान- मोठे तीक्ष्ण हत्यारे मिळून आली. ही सर्व हत्यारे पोलिसांनी जप्त केली आहेत. ही घातक शस्त्रे शहरात आल्याने पोलिसांनी त्याचा कसून तपास सुरू केला आहे. येथील पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून धुळे रोडवरील नवनाथनगराीलत एका महिलेच्या घरावर बुधवारी छापा टाकला. घराची तपासणी केली असता, १९ तलवारी, लहान व मोठे ११ चाकू मिळून आले. ही शस्त्रे शहरात विकण्यासाठी आणली होती का, असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे. पूजेसाठी आणली शस्त्रे महिलेच्या भावाने शस्त्रसाठा आणला होता आणि तो मोहरमच्या पूजेसाठी आणल्याचे संबंधित महिलेने चौकशीत पोलिसांना सांगितले. या प्रकरणी संबंधित महिलेसह महेंद्र रंगनाथ हतांगळे (रा. नारायणवाडी, चाळीसगाव) याच्याविरोधात शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. आणखी तलवार जप्त शहर पोलिसांनी रेकॉर्डवरील ८० जणांची चौकशी केली. यात ४४ संशयित घरी मिळून आले. त्यांना पोलिस ठाण्यात आणून समज देण्यात आली. शहरातील नागद रोडवरील झोपडपट्टी भागात फरीद खान शाबीर खान तलवार बाळगताना मिळून आला. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वाहनेही जप्त शिवाय कार (एमएच २०, ईजे ४८९०) गौरव जाधव (वय ४४, रा. भिमनगर, चाळीसगाव), कार (एमएच १४, ईपी ७३५८) अनिकेत गवळी (वय ३४, रा. अभिनव शाळेसमोर, भडगाव रोड चाळीसगाव) व कार (एमएच ४३, एआर ३४०९) चेतन गवळी (वय २८, रा. हिरापूर रोड, चाळीसगाव) यांच्याकडून ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. याचवेळी गावठी दारूची भट्टी व एक हजार कच्चे रसायन नष्ट करण्यात आले. हे कोंबिंग ऑपरेशन पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलिसांनी राबविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com