सर्वोदय शिक्षण संस्थेचे दप्तर गहाळ

सर्वोदय शिक्षण संस्थेचे दप्तर गहाळ
Published on
CSG26B02892 (सिंगल कॉलम) चाळीसगाव ः पत्रकार परिषदेत माहिती देताना चेअरमन विकास पाटील. शेजारी रवींद्र पाटील, भाऊसाहेब जगताप आदी. सर्वोदय शिक्षण संस्थेचे दप्तर गहाळ अध्यक्ष विकास पाटील यांचा आरोप; गुन्हा दाखल करण्याची मागणी सकाळ वृत्तसेवा चाळीसगाव, ता. १२ : उंबरखेड (ता. चाळीसगाव) येथील सर्वोदय शिक्षण संस्थेची निवडणूक झाल्यानंतर संस्थेच्या कारभारावरून वाद निर्माण झाला आहे. संस्थेचे महत्त्वाचे दप्तर व कागदपत्रे गहाळ झाल्याची तक्रार संस्थेचे अध्यक्ष विकास पाटील यांनी मेहुणबारे पोलिस ठाण्यात केली आहे. मात्र, या तक्रारीवर अद्याप गुन्हा दाखल झालेला नसल्याची माहिती विकास पाटील यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. सर्वोदय शिक्षण संस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत विकास पाटील यांच्या पॅनलने १९ पैकी १५ जागांवर विजय मिळविला. निवडणुकीपूर्वी माजी सचिवांनी मयत सभासदांची नावे वगळून आपल्या मर्जीतील १३३ नवीन सभासदांची नावे मतदारयादीत समाविष्ट केल्याचा आरोप श्री. पाटील यांनी केला. आपल्याला मात्र जुनीच मतदारयादी दाखविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दप्तर देण्यास टाळाटाळ निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर संस्थेच्या मुख्य कार्यालयातील दप्तराचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. माजी सचिवांकडे संस्थेचे दप्तर मागितले असता, त्यांनी ते देण्यास टाळाटाळ केल्याचे विकास पाटील यांनी सांगितले. त्यानंतर सहायक निबंधक कार्यालयातील नितीन पाटील व पोलिसांच्या उपस्थितीत कार्यालयाला लावलेले ‘सील’ काढण्यात आले. कार्यालयाची तपासणी केली असता संस्थेची महत्त्वाची कागदपत्रे व अन्य दप्तर उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. याबाबत पंचनामा करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. प्रशासकीय कामे रखडली संस्थेच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे उपलब्ध नसल्याने अनेक प्रशासकीय कामे रखडली आहेत. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अध्यक्ष विकास पाटील यांनी केली. पत्रकार परिषदेला संस्थेचे सचिव रवींद्र पाटील, सहसचिव भाऊसाहेब जगताप, संचालक भगवान पाटील, प्रशांत एम. पाटील, रवींद्र केदारसिंग पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान, या आरोपांबाबत माजी सचिवांशी संपर्क साधला असता, आपण याबाबत लवकरच आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. --------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com