बाप्पाच्या आगमनाची तयारी; यंदा ''दरबार'' महागला, बजेट कोलमडले !

बाप्पाच्या आगमनाची तयारी; यंदा ''दरबार'' महागला, बजेट कोलमडले !
Published on
CSG26B02899 चाळीसगाव ः बाजारात थाटलेल्या गणेशमूर्तींच्या दुकानावर मूर्तीची खरेदी करताना गणेशभक्त. चाळीसगावात बाप्पाच्या आगमनाची तयारी यंदा ‘दरबार’ महागला; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना खर्चाचा झटका सकाळ वृत्तसेवा चाळीसगाव, ता. १२ ः अवघ्या एक दिवसावर आलेल्या गणरायाच्या स्वागतासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची लगबग सुरू आहे. यंदा वाढत्या महागाईने मंडळांचे ‘बजेट’ बिघडवले आहे. मंडपाचे बांबू, लाकूड, कापड, सजावटीचे साहित्य, विद्युत व्यवस्था आदींच्या खर्चात वाढ झाल्याने उत्सवासाठी अधिक निधी उभारण्याची वेळ मंडळांवर आली आहे. शहरातील पोलिस ग्राऊंड मैदान परिसरात श्री गणेशमूर्तींची दुकाने थाटली असून यंदा मूर्तींच्या किमतीही महागाईमुळे १५ ते २० टक्क्यांनी वाढल्या आहेत. गणेश मंडळांना मंडप आणि सजावटीचा खर्च तसेच मजुरांच्या मजुरीत झालेल्या वाढीचा फटका बसत आहे. शाडूची माती, ‘पीओपी’ आणि रंगांच्या दरवाढीचा परिणाम गणेशमूर्तीच्या किमतीवरही झाला आहे. गेल्या वर्षी सुमारे १ हजार २०० रुपयांना मिळणारी दीड फुटाची ‘पीओपी’ची मूर्ती यंदा १ हजार ६०० ते दोन हजारांपर्यंत मिळत आहे. शाडूच्या लहान मूर्तीच्या दरातही वाढ झाली आहे. बाप्पाच्या नैवेद्याचाही खर्चही वाढला आहे. साखर, दूध, मावा, तूप, तेल, सुके खोबरे आणि चना डाळीच्या दरवाढीमुळे मोदक, लाडू आणि अन्य प्रसादासाठी अधिक खर्च करावा लागत आहे. गणेशोत्सवाच्या काळात फुलांची मागणी वाढल्याने झेंडू, मोगरा आणि गुलाबाच्या दरातही काहीशी वाढ झाली आहे. मदतीवर मंडळाचा भर वाढता खर्च भागविण्यासाठी गणेशोत्सव मंडळांचा जाहिरातदार, स्थानिक रहिवासी आणि लोकप्रतिनिधींकडून निधी उभारण्यावर भर आहे. विद्युत रोषणाई, ध्वनीयंत्रणा, आगमन- विसर्जन मिरवणूक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा खर्च वाढल्याने देणग्या व जाहिरातींच्या माध्यमातून अतिरिक्त निधी उभारला जात आहे. गणेश मंडळांना मंडप उभारणीसाठी ५० हजारांपासून दीड लाख, मूर्तीसाठी ३० ते ४० हजार, प्रसादासाठी ८ ते १० हजार, आगमन-विसर्जन मिरवणुकीतील वाद्यांसाठी ७० ते ८० हजार तर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी २५ ते ३० हजार रुपयांची तरतूद करावी लागत आहे. लहान मंडळाचे ‘बजेट’ कमी असले तरी त्यांनाही काही ना काही आर्थिक नियोजन करावे लागत आहे. गतवर्षीच्या तुलनेत एकूण खर्चात सुमारे १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. पूजेचे साहित्यही महागले मूर्तीच्या दरवाढीसोबतच नैवेद्याचे साहित्य आणि अन्य पूजेचे साहित्य देखील महागले आहे. कापूर, अगरबत्ती, धूप, फुलवातीसह इतर साहित्यांच्या दरात काही अंशी वाढ झाल्याचे दिसून यत आहे. सजावटीच्या वस्तू, फुले, हार आदींच्या किमतीतही वाढ झाली आहे. ---------------------- सर्वसाधारणपणे मूर्तींचे दर पाच फूटांपेक्षा अधिक ..... १५ हजार रुपयांपासून पुढे साडेतीन फूटापर्यंत ......... ३ ते साडेचार हजार दोन फूटापर्यंत .............. १ हजार ५०० ते १ हजार ८०० सव्वा फूटापर्यंत ............ ५५० ते ७५० रुपये --------------------------पूर्ण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com