चाळीसगावला न. पा. लिपिकाची एक वेतनवाढ रोखली

चाळीसगावला न. पा. लिपिकाची एक वेतनवाढ रोखली
Published on
चाळीसगाव नगरपालिकेच्या लिपिकाची वेतनवाढ रोखली सकाळ वृत्तसेवा चाळीसगाव, ता. २१ ः नगरपरिषदेच्या मालकीच्या गाळ्यांच्या लिलाव प्रक्रियेत झालेल्या कथित अनियमिततेप्रकरणी लिपीक दीपक देशमुख यांच्याविरुद्ध झालेल्या विभागीय चौकशीनंतर मुख्याधिकारी हेमंत बनगर यांनी एक वेतनवाढ रोखण्याची कारवाई केली आहे. महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम अंतर्गत झालेल्या चौकशीच्या अहवालात कर्तव्यात कसूर केल्याचे निष्पन्न झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार १० सप्टेंबरपासून श्री. देशमुख यांची एक वेतनवाढ रोखण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्याची नोंद सेवा पुस्तकात घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. विभागीय चौकशीचा अहवाल अपूर्ण असून प्रकरणातील काही महत्त्वाचे पुरावे तपासण्यात आलेले नाहीत, असा दावा तक्रारदार गणेश अग्रवाल यांनी केला आहे. संबंधित गाळ्याचे ‘स्पॉट व्हेरिफिकेशन’ करण्यात आले असता, त्याच्या अवघ्या दोन तासांपूर्वी गाळा केवळ चौकशीसाठी खाली करून देण्यात आल्याचे दिसून आले होते. संबंधित गाळा सुरु असल्याचे ‘लाईव्ह लोकेशन’सह व्हिडिओ व छायाचित्रे गणेश अग्रवाल यांच्याकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे संबंधित गाळ्याचा प्रत्यक्ष वापर नेमका किती कालावधीसाठी झाला, याची स्वतंत्रपणे पडताळणी करण्याची गरज असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. चावी देण्यास टाळाटाळ नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित गाळ्याची चावी मागितल्यानंतर पतपेढीचे चेअरमन दीपक देशमुख यांनी चावी देण्यास सुमारे १५ दिवस ते महिनाभर टाळाटाळ केली, असा आरोपही गणेश अग्रवाल यांनी केला आहे. यासंदर्भातील नगरपरिषदेच्या नोंदी, पत्रव्यवहार तसेच चावी प्रत्यक्षात कधी हस्तांतरित करण्यात आली, याचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, या सर्व बाबींची पडताळणी करून याची पुन्हा सखोल व निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी तक्रारदार श्री. अग्रवाल यांनी केली आहे. त्यानुसार, त्यांनी उपस्थित केलेल्या नव्या पुराव्यांची प्रशासनाकडून तपासणी केली जाते का? याकडे आता लक्ष लागले आहे. -------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com