दोंडाईचा. . गणपती विसर्जन पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याकडून पुष्पवृष्टी

दोंडाईचा. .  गणपती विसर्जन पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याकडून पुष्पवृष्टी
Published on
DO126B04332 दोंडाईचा : गाव दरवाजाजवळ मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करताना पालकमंत्री जयकुमार रावल. ------ दोंडाईचा येथे गणरायाला भावपूर्ण निरोप मंत्री रावल यांच्याकडून मिरवणुकीवर पुष्पवृष्टी सकाळ वृत्तसेवा दोंडाईचा, ता. २२ : शहरात गणेशोत्सवाच्या सात दिवसांच्या उत्साहानंतर रविवारी (ता. २०) सायंकाळी विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण, पुष्पवृष्टी, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात गणरायाला भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला. राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांनी मिरवणुकीतील मानाच्या गणेश मूर्तीवर पुष्पवृष्टीचा वर्षाव केला. शहरातील मानाचे दादा गणपती, बाबा गणपती आणि वीर भगतसिंग गणपतींच्या मिरवणुकीत गणेशभक्तांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. मिरवणुकीदरम्यान ढोल-ताशांच्या पथकांनी सादर केलेल्या तालावर तरुणाईसह गणेशभक्तांनी ठेका धरला. विविध गणेश मंडळांच्या आकर्षक सजावटी, विद्युत रोषणाई आणि भक्तिमय वातावरणामुळे शहरातील वातावरण गणेशमय झाले होते. मानाचे तीनही गणपती मिरवणुकीत एकत्र आल्यानंतर आझाद चौकातील झालेली हरिहर भेट विशेष आकर्षण ठरली. रात्री आठला आझाद चौकातील दादा, बाबा व वीर भगतसिंग गणपतीच्या हरीहर भेटीत गणपतीची आरती झाली. रात्री दहाला गाव दरवाजाजवळ पालकमंत्री जयकुमार रावल यांनी आरती करून पुष्पवृष्टी केली. या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण महाजन, शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे, हितेंद्र महाले, नगरसेवक निखिल जाधव, मुकेश देवरे, नरेंद्र गिरासे, चिरंजीव चौधरी, कृष्णा नगराळे, सचिन सोनवणे, राकेश अग्नरवाल, मनोज धनगर, नबु पिंजारी, खलील बागवान उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत टाकरखेडा जवळील तापी नदीपात्रात गणपतीचे विसर्जन करण्यात आले. अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, शिरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील, पोलिस निरीक्षक दिनेश सोनवणे, मुख्याधिकारी देवेंद्रसिंग परदेशी, अपर तहसीलदार सुरेश कोळी, आगार व्यवस्थापन मिलिंद परदेशी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com